महावितरणमध्ये नोकरीची मोठी संधी!

134

डिग्री आणि डिप्लोमा धारकांसाठी महावितरणमध्ये नोकरीची मोठी संधी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, लातूर येथे शिकाऊ अभियंता पदवीधर आणि शिकाऊ अभियंता डिप्लोमा या पदांसाठी ही भरती असणार आहे.

या पदांसाठी भरती

  • शिकाऊ अभियंता पदवीधर (Apprentices Engineer Degree Diploma)
  • शिकाऊ अभियंता डिप्लोमा (Apprentices Engineer Diploma)

एकूण जागा – 26

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

शिकाऊ अभियंता पदवीधर (Apprentices Engineer Degree Diploma) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलेलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवार  2019 नंतरचा पदवीधर असणं आवश्यक आहे.
  • उमेदवार इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर असणं आवश्यक आहे.

शिकाऊ अभियंता डिप्लोमा (Apprentices Engineer Diploma) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमापर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवार  2019 नंतरचा पदवीधर असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असणं आवश्यक आहे.

( हेही वाचा: मुंबईला मागे टाकत, हा जिल्हा मुलांच्या लसीकरणात अग्रेसर! )

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे कमीतकमी 14 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. तर यासाठी कोणतीही वयाची अट नसणार आहे.

इतका मिळणार Stipend

  • शिकाऊ अभियंता पदवीधर (Apprentices Engineer Degree Diploma) – 9000/- रुपये प्रतिमहिना
  • शिकाऊ अभियंता डिप्लोमा (Apprentices Engineer Diploma) – 8000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2022

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://portal.mhrdnats.gov.in/boat/login/user_login.action या लिंकवर क्लिक करा.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.