#CarnacBridge: ब्रिटीशकालीन कर्नाक पूल होणार इतिहासजमा

मुंबईतील मशीद स्टेशनजवळील ब्रिटीशकालीन कर्नाक पूल आज, रविवारी रात्री इतिहासजमा होणार आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून या पूलाच्या पाडण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या ३६ एक्सप्रेस गाड्यांसह १०९६ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यासोबतच ५७ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

या ब्रिटीशकालीन कर्नाक पूलाच्या कामासाठी मध्य रेल्वेने २७ तासांचा शनिवार आणि रविवार असा ब्लॉक जाहीर केला आहे. हे पाहता राज्य शासनाने एसटी महामंडळ आणि बेस्ट उपक्रमाच्या जादा बसेसची व्यवस्था केली आहे. मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पूल तोडण्यासाठी मोठ्या क्रेनसह ५० गॅस कटर आणि ३०० गॅस सिलिंडरचा वापर केला जात आहे. आज रात्रीपर्यंत पूल तोडण्याचे काम पूर्ण होणार असल्याचे मध्ये रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे, कल्याण, कर्जत, कसारा या मार्गावरील भायखळा, परळ, कुर्ला, दादर या स्थानकांवरून धीम्या लोकल सोडण्यात येत असल्याचे प्रवक्त्याने सांगितले. मध्य रेल्वेने प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मध्य रेल्वेने पुणे-मुंबई मार्गासह मुंबईहून निघणाऱ्या आणि पुण्याहून सुटणाऱ्या ३६ गाड्या रद्द केल्या आहेत. ५७ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

(हेही वाचा – मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ‘२७ तासांचा’ मेगाब्लॉक; अनेक गाड्या रद्द, एक्स्प्रेसचे वेळापत्रक बदलले)

कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी तब्बल २७ तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक दिनांक १९ आणि २० नोव्हेंबर (शनिवार/रविवार) रोजी मध्य रेल्वे मार्गावर आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मस्जिद स्टेशन दरम्यान किमी 0/1-2 येथे रोड क्रेन वापरून कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक असल्यामुळे लोकलचे वेळापत्रक खालीलप्रमाणे असणार आहे…

( हेही वाचा : देशी दारू प्यायले अन् २४ हत्ती झोपले; ओडिशामध्ये घडला अजब प्रकार )

मध्य रेल्वे ब्लॉक कालावधी

  • मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गावर शनिवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते रविवार दिनांक २० नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत = १७.०० तासांचा ब्लॉक.
  • मध्य रेल्वेच्या जलद मार्गावर शनिवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते रविवार दिनांक २० नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत = १७.०० तासांचा ब्लॉक.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक :

  • शनिवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते रविवार दिनांक २० नोव्हेंबर २०२२ रात्री ८ वाजेपर्यंत = २१.०० तासांचा ब्लॉक.

सातवी मार्गिका आणि यार्ड:

शनिवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते रविवार दिनांक २१ नोव्हेंबर२०२२ मध्यरात्री ०२:०० वाजेपर्यंत = २७.०० तासांचा ब्लॉक.

रेल्वे सेवा चालू राहणार नाहीत:

  • हार्बर मार्ग: वडाळा रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस.
  • धिम्या मार्गावर: भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस.
  • जलद मार्गावर: भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस.

रेल्वे सेवांवर परिणाम:

उपनगरीय गाड्या रद्द

  • ब्लॉक कालावधीत उपनगरीय सेवा भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावरील वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान उपलब्ध राहणार नाहीत.
  • मुख्य मार्गावरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा भायखळा, परळ, दादर आणि कुर्ला स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरीजनेट होतील. भायखळा, परळ, दादर, कुर्ला ते ठाणे आणि त्यापलीकडे उपनगरीय गाड्या कमी वारंवारतेने चालवल्या जातील.
  • हार्बर लाईनवरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा वडाळा रोड स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरीजनेट केल्या जातील. वडाळा रोड ते कुर्ला आणि त्यापलीकडे उपनगरीय गाड्या कमी वारंवारतेने चालवल्या जातील.
  • रविवारी चालणाऱ्या वातानुकूलित उपनगरी सेवा उपलब्ध नसतील. बृहन्मुंबई महानगर पालिकेला ब्लॉक प्रभावित भागात पुरेशा बसेस चालवण्याची विनंती केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here