राम मंदिराच्या उभारणीसाठी राजस्थानातील कोरीव दगड, जाणून घ्या मंदिराचे गर्भगृह कधी उघडणार

115

अयोध्येतील श्री राम मंदिर लवकरच आकारास येणार आहे. यासाठी लागणारे कोरीव दगड राजस्थानातून येण्यास सुरूवात झाली आहे. यासोबतच हे दगड जोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तांब्याच्या पट्ट्याही बांधकामाच्या ठिकाणी मागवण्यात आल्या आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त अनिल मिश्रा यांनी सांगितले की, दगड बसवण्यास सुरूवात झाली असून, राजस्थानच्या वर्कशॉपमध्ये कोरलेल्या दगडांचे 4 ट्रक, तांब्याच्या पट्ट्यांचा पुरवठाही सुरू झाला आहे. ठरवून दिलेल्या कालमर्यादेत आपली कार्यपद्धती योग्य दिशेने चालली आहे, असा विश्‍वास मिश्रा यांनी व्यक्त केला आहे.

( हेही वाचा : एसटी सुरु करा, नाहीतर खुर्ची खाली करा! शाळकरी मुलाची आर्त हाक )

राम मंदिराचे बांधकाम कधी होणार?

डिसेंबर 2023 पर्यंत श्री रामजन्मभूमी मंदिराचा पहिला मजला तयार करून गर्भगृहात रामलल्लाची स्थापना करण्याची ट्रस्टची योजना आहे. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले केले जाईल आणि 2025 पर्यंत रामजन्मभूमी संकुलात भव्य दिव्य राम मंदिर तयार होईल. सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल येईपर्यंत श्री राम मंदिरासाठी वापरण्यात येणाऱ्या दगडांपैकी ५० टक्के दगड कोरून तयार झाले होते. असेही अनिल मिश्रा यांनी सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.