अँटिलिया आणि मनसुख हिरेन प्रकरणात लवकरच होणार गौप्यस्फोट!

116

अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणात लवकरच मोठा गौप्यस्फोट होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्याकांडाचा सुरुवातीला तपास करणाऱ्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने अँटिलीया आणि हिरेन प्रकरणासंबधी गोपनीय अहवाल न्या. चांदीवाल आयोगाकडे सोपवला आहे. या अहवालात संवेदनशील आणि अनेक खुलासे करणारी माहिती असल्याचे सूत्रांकडून समजते. या प्रकरणात नेमका काय गौप्यस्फोट होणार आहे हे कळले नसले तरी अँटिलिया प्रकरणात कुठला मोठा अधिकारी अथवा मोठी व्यक्तीचा संबंध होता हे स्पष्ट होणार असल्याची सूत्राची माहिती आहे.

(हेही वाचा – लोकाभिमुख, विकासाभिमुख व पर्यावरणपुरक असा महापालिकेचा अर्थसंकल्प : महापौर)

आयोगाकडून अहवाल राज्य शासनाकडे सुपूर्द होणार

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी वसुलीच्या कथित आरोपाच्या चौकशीसाठी राज्य शासनाने निवृत्त न्यायाधीश चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. न्या. चांदीवाल आयोगा कडून या प्रकरणात परमबीर सिंग, अनिल देशमुख, सचिन वाझे सह संबंधिताची चौकशी करून त्याचा जबाब नोंदवून घेतलेला आहे. आयोगाचा तपास शेवटच्या टप्प्यावर सुरु असून लवकरच आयोगाकडून या तपासाचा अहवाल राज्य शासनाकडे सुपूर्द केला जाणार आहे. गुरुवारी या प्रकरणात आयोगा समोर अनिल देशमुख. संजीव पलांडे आणि सचिन वाझे यांना हजर करण्यात आले होते. दरम्यान महाराष्ट्र दहशतवाद विरोधी (एटीएस) चे सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचे दोन अधिकारी ८०६ पानाचे गोपनीय अहवाल घेऊन आले होते, या अधिकाऱ्यानी हा अहवाल आयोगाकडे सोपवला आहे. दरम्यान अधिकाऱ्यांनी आयोगाकडे विनंती केली आहे की, या गोपनीय अहवालातील कागदपत्रे संवेदनशील असल्या कारणाने याच्या प्रती दुसऱ्या बाजूला पुरवण्याची गरज नाही. त्यामुळे आयोगाने हा गोपनीय अहवाल आपल्या ताब्यात घेतला आहे.

गोपनीय अहवालातून मोठा गौप्यस्फोट होणार

एटीएसच्या अधिकाऱ्यांनी न्या. चांदीवाल आयोगाकडे सोपवलेला गोपनीय अहवाल हा अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील संवदेनशील आणि गोपनीय रेकॉर्ड आहे. आयोगाने २५ जानेवारी रोजी हा अहवाल सादर करण्याचे निर्देश एटीएसला दिले होते. चांदीवाल आयोगाचे पुढील सुनावणी ८ फेब्रुवारी रोजी होणार असून या गोपनीय अहवालाचा खुलासा ८ फेब्रुवारी रोजी अथवा त्यापूर्वी होण्याची शक्यता आहे. या गोपनीय अहवालातून मोठा गौप्यस्फोट होणार असून अँटिलिया प्रकरणात कुठल्या मोठ्या व्यक्तीचा किंवा अधिकारी सामील आहे याचा खुलासा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.