जीएसटी चुकवणाऱ्या सहा कंपन्यांवर गुन्हे दाखल

वस्तू व सेवा कर विभागाने खोटी देयके सादर करणाऱ्या विविध सहा कंपन्यांच्या मालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी एकाला अटक करण्यात आली असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

( हेही वाचा : फक्त ७५० रुपयांमध्ये मिळेल गॅस सिलेंडर; २८ हून अधिक शहरांमध्ये उपलब्ध)

पाच कंपन्यामध्ये ७५.११ कोटीची बनावट देयके

बनावट पावत्यांमध्ये सहभागी असलेल्या करदात्यांविरुद्ध महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग म्हणून बालाजी स्टील कंपनीची चौकशी करण्यात आली. तसेच बालाजी स्टीलसह द्वारकेश ट्रेडर, एस.के.एन्टरप्रायजेस, परमार एन्टरप्रायजेस, अलंकार ट्रेडींग, शुभ ट्रेडर या सहा कंपन्यांच्या विविध शाखांवरही तपास करण्यात आला. यामध्ये बालाजी स्टील कंपनीमध्ये ११.५ कोटीची बनावट देयके, तसेच इतर पाच कंपन्यामध्ये ७५.११ कोटीची बनावट देयके आढळली आहेत.

आर्थिक वर्षात केलेली ही ४१ वी अटक

या प्रकरणात भंवरलाल गेहलोत (वय – ४५) याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. करचोरी प्रकरणी चालू आर्थिक वर्षात केलेली ही ४१ वी अटक आहे. राज्य कर, अन्वेषण-बी चे सहआयुक्त वनमथी सी., राज्य कर उपायुक्त मनाली पोहोरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य कर विभागाचे सहाय्यक आयुक्त महेंद्र पवार, प्रसाद आडके, सायली धोंडगे आणि दिनेश भास्कर यांच्यासह राज्य कर निरीक्षक आणि कर सहाय्यक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here