थरारक पाठलाग करत कारमधून 4 कोटींची रोकड जप्त

113

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून जाणाऱ्या स्विफ्ट कारचा पाठलाग करत लोणावळा ग्रामीण पोलिसांनी चार कोटी रोकड ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी महेश नाना माने (चालक), विकास संभाजी घाडगे या दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने अज्ञात वाहनातून शस्त्र आणि पैसे घेऊन जाणार असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना मिळाली होती.

seized

पोलिसांनी सिनेस्टाईल केला पाठलाग

त्यानुसार, पोलिसाचं एक पथक तपास करत होते. यावेळी KA-53-MB-8508 मारुती स्विफ्ट ही गाडी भरधाव पुण्याच्या दिशेने येत होती. पोलिसांनी या गाडीस हात दाखवून थांबवण्यास सांगितले. मात्र पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून गाडीला थांबवले. यावेळी गाडीची तपासणी केली असता चोर कप्प्यात तब्बल चार कोटी रुपये पोलिसांना आढळले. या प्रकरणाची माहिती आयकर विभागाला देण्यात आली असून पुढील कारवाई करत आहेत. ही कारवाई लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

(हेही वाचा – १ एप्रिलपासून एसटी पूर्ण क्षमतेने धावणार)

पोलिसांनी दिली आयकर विभागास माहिती

याप्रकरणी मोटार चालक महेश माने, विकास घाडगे या दोघांना ताब्यात घेण्यात आले. एवढी मोठी रक्कम कुठून कुठे व कोणत्या कारणासाठी नेण्यात येत होती. आवश्यक कागदपत्रे, वाहतुक परवाना याबाबत समाधानकारक माहिती या दोघांना पोलिसांनी दिली नाही. याप्रकरणी हवालाचा कोणता प्रकार आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. सदर रकमेसंदर्भात पोलिसांनी आयकर विभागास माहिती दिली. फौजदार सचिन बनकर, अनिल लवटे, कर्मचारी सितारमा बोकड, युवराज बनसोडे, अमित ठोसर, पुष्पा घुगे,गणेश होळकर, किशोर पवार, सिद्धेश्वर शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.