CBI ची मोठी कारवाई! TATA प्रकल्पाच्या 6 अधिकाऱ्यांना अटक

139

ईशान्य भारतातील प्रादेशिक ऊर्जा प्रणाली सुधार प्रकल्पातील भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने गुरुवारी टाटा प्रकल्पाच्या 6 अधिकाऱ्यांना अटक केली. यामध्ये कार्यकारी व्हीपी देशराज पाठक आणि सहाय्यक व्हीपी आरएन सिंह यासारख्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान आपला कोणताही अधिकारी अश्या घटनांत सहभागी नसल्याचे टाटा कंपनीने स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तैलचित्राचे होणार अनावरण)

भ्रष्टाचाराच्या आरोपावरून 6 अधिकाऱ्यांना अटक

केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने गुरुवारी टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या सहा अधिकाऱ्यांना आणि पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक बी एस झा यांना टाटा प्रोजेक्ट्सच्या लाचखोरी प्रकरणात अटक केली. एजन्सी गुरुग्राम, दिल्ली आणि गाझियाबादमध्ये 11 ठिकाणी शोध मोहिम राबवली. ईशान्य प्रादेशिक ऊर्जा प्रणाली सुधार प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून टाटा प्रकल्पाच्या 6 अधिकाऱ्यांना अटक केल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

93 लाखांची रोकड जप्त

त्यासोबतच सीबाआयने गाझियाबाद, नोएडा, गुरुग्राम यासह इतर ठिकाणी शोध घेतला होता, त्या दरम्यान झा यांच्या गुरुग्राम परिसरातून 93 लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती. झा सध्या इटानगरमध्ये तैनात आहे. झा कथितपणे टाटा प्रकल्पांना बेकायदेशीर पेमेंटच्या बदल्यात विविध प्रकल्पांमध्ये मदत करत असल्याचा सीबीआयचा दावा आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.