माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ; ‘हे’ दस्ताऐवज CBI ने केले जप्त

94

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे निवृत्त झाल्यापासून त्यांच्या पाठीमागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. जून महिन्याच्या 30 तारखेला ते निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना तिस-या दिवशी ईडीची नोटीस आली होती. त्यांनी फोन रेकाॅर्ड केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांची शनिवारी सीबीआयच्या अधिका-यांनी चौकशी केली असल्याची माहिती समजली आहे.

आत्तापर्यंत एजन्सीने 25 डेस्कस्टाॅप, दोन लॅपटाॅप, मोबाईल फोन, कथितपणे बेकायदेशीर फोन टॅपिंगशी जोडलेले अनेक दोषी दस्ताऐवज जप्त केले असल्याची माहिती मिळाली आहे. 2018 च्या सुरुवातीस एनएसईने माजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश असलेल्या इतर काही प्रकरणामंध्ये चौकशी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे सगळं थांबवण्यात आले आहे. सीबीआय अधिका-यांच्या पथकाने शुक्रवारी संजय पांडे यांच्या अंधेरी येथील चार बंगला निवसस्थानी छापा मारला. सकाळी नऊच्या सुमारास टीम त्यांच्या पहिल्या मजल्यावरील निवासस्थानी पोहोचली. त्यावेळी सीबीआयच्या टीमने त्यांच्या घराची रात्री उशिरापर्यंत चौकशी केली. त्यावेळी संजय पांडे यांची वृद्ध आई फक्त घरी होती.

यांच्यावरही गुन्हा दाखल 

सीबीआयने संजय पांडे, चित्रा रामकृष्ण आणि एनएसईचे माजी संचालक रवी राणा यांच्याविरुद्ध 2009 ते 2017 दरम्यान एक्सचेंजच्या कर्मचा-यांच्या कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी संतोष पांडे, आनंद नारायण, अरमान पांडे, मनीष मित्तल, माजी वरिष्ठ माहिती सुरक्षा विश्लेषक नमन चतुर्वेदी आणि अरुण कुमार सिंग यांच्यासह माजी संचालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.