बँकेच्या मूल्यांकनकारांकडून वाढीव कर्जवाढ मिळवणे आणि कर्जापोटी प्राप्त रकमेचा गैरवापर करत बँक ऑफ महाराष्ट्रला साडेचार कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी सीबीआयने अहमदाबादस्थित व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल केला केल्याचे समोर आले आहे.
काय आहे प्रकरण
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषी कॉटेक्स या कापसाशी निगडित व्यापार करणाऱ्या कंपनीला विस्तारासाठी कर्ज हवे होते. याकरिता कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने बँक ऑफ महाराष्ट्रकडे कर्जाची मागणी केली. कर्ज देताना कंपनीची पत तपासण्यासाठी बँकेने मूल्यांकनकारांकडून (व्हॅल्युअर) अहवाल मागवला होता. मात्र, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या मूल्यांकनकारांशी संधान साधत कंपनीच्या ऐपतीपेक्षा वाढीव अहवाल बनवून घेतला.
(हेही वाचा – “MSRTC ला दिलेली मदत अपुरी, राज्य सरकारचा ठिगळे लावण्याचा प्रकार”)
या अहवालामुळे तीन कोटी रुपयांचे कर्ज मिळाले होते. कर्जाचे पैसे कंपनीला मिळाल्यानंतर, कंपनीने या पैशांद्वारे प्रत्यक्ष कोणताही व्यवहार केला नाही. त्याऐवजी या कर्जप्राप्त रकमेच्या बनावट नोंदी करीत त्या पैशांची अफरातफर केल्याचा मुद्दा सीबीआयने एफआयआरमध्ये नमूद केला आहे. या प्रकरणी कंपनीच्या संचालकांसह सहाजणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community