चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी CBI ची मोठी कारवाई! देशात ५६ ठिकाणी छापे

158

इंटरपोलच्या माहितीनंतर सीबीआयने देशभरात छापासत्र सुरू केले आहे. देशातील जवळपास २० राज्यांमध्ये सीबीआयने ५६ ठिकाणी छापे टाकले आहेत. ऑनलाईन चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी सीबीआयने ही मोठी कारवाई केली आहे. या ५६ ठिकाणांमध्ये मुंबई, दिल्ली, बंगळुरू या मोठ्या शहरांचा सुद्धा समावेश आहे.

( हेही वाचा : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान PFI ने रचला होता हल्ला करण्याचा कट? ईडीचा दावा)

सीबीआयचे ‘ऑपरेशन मेघदूत’ 

इंटरपोल जगभरातील देशांना चाईल्ड पोर्नोग्राफी संदर्भात अलर्ट करण्याचे काम करते. चाईल्ड प्रोटेक्शन फंड या संस्थेने कोरोना काळात ९५ टक्के चाईल्ड पोर्नोग्राफी कंटेन्ट देशातून जात असा दावा केला होता. यानुसार आता सीबीआयने एकाचवेळी छापे टाकले आहेत. चाईल्ड पोर्नोग्राफी कंटेन्ट विकण्याशिवाय या रॅकेटमधील आरोपी मुलांना ब्लॅकमेल करून अश्लील व्हिडिओ तयार करून वेबसाईटवर अपलोड करायचे अशी माहिती सीबीआयला मिळाली आहे. सीबीआयने या कारवाईला ‘ऑपरेशन मेघदूत’ असे नाव दिले आहे.

सीबीआयला सिंगापूरमधून इंटरपोलच्या माध्यमातून या प्रकरणाची माहिती मिळाली होती, त्यानंतर सीबीआयने कारवाई केली असून, सध्या दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पाटणासह २० राज्यांमध्ये सीबीआयचे धाडसत्र सुरू आहे. सोशल मीडियावर सातत्याने अपलोड होत असलेल्या चाइल्ड पॉर्नोग्राफीच्या व्हिडिओ समस्येवर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा चिंता व्यक्त केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.