मुंबई-पुण्यात CBI चे आठ छापे! व्यवसायिक विनोद गोयंकांसह अविनाश भोसलेंची झडती

108

येस बँकेच्या फसवणुकीप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) शनिवारी मोठी कारवाई केली. सीबीआयने मुंबई आणि पुण्यातील या प्रकरणाशी संबंधित संशयितांच्या आठ ठिकाणांवर आणि कार्यालयांवर छापे टाकल्याचे समोर आले आहे. या छाप्यात येथून अनेक कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. अलीकडेच सीबीआयने या प्रकरणाशी संबंधित बांधकाम व्यावसायिक संजय छाब्रियालाही अटक केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयच्या वेगवेगळ्या पथकांनी ही कारवाई केली आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विनोद गोयंका यांच्या घरावर छापे टाकण्यात आले असताना दुसरीकडे मुंबईतही केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी शाहिद बलवा आणि बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर छापे टाकले आहेत.

(हेही वाचा – राणा दाम्पत्याला दणका! न्यायालय म्हणतंय, तुरुंगातलंच जेवण करा! )

व्यावसायिक अविनाश भोसले यांचं घर आणि काही मालमत्तांवर सीबीआयनं छापेमारी सुरू केली आहे. यापूर्वीही गेल्या वर्षी ईडीने कारवाई करत अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबाची जवळपास ४०.३४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. अविनाश भोसले हे प्रसिद्ध बांधकाम तसेच हॉटेल व्यावसायिक असून ते कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरेही आहेत. मुंबई आणि पुण्यात त्यांचा बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे.

येस बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने व्यावसायिक आणि रेडियस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संजय छाब्रिया यांना अटक केली होती. या अटकेशी संबंधित ही छापेमारी केली आहे. दरम्यान या छापेमारीसंदर्भात सांगताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाधवान ब्रदर्स यांनी जबरदस्त लुटलं आहे. बीकेसीत छाब्रिया यांचं ऑफिस आहे आणि बीकेसीतून जवळच बांद्रा इथे कुणाच्या खात्यात पैसे गेले याचीही चौकशी होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.