केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाचा निकाल सोमवारी ४ जुलै रोजी जाहीर होणार अशी चर्चा रंगताना दिसत आहे. सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २४ मे रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेनंतर निकाल कधी लागणार याकडे तब्बल २१ लाख विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. तसेच आजच हा निकाल जाहीर होणार असे मेसेज सोशल मीडियावर पसरत होते. मात्र सीबीएसई बोर्डाच्या या परीक्षेबाबत मोठी बातमी समोर येत आहे. सीबीएसई बोर्डाचा निकाल आज लागणार की नाही, याबाबत CBSE चे जनसंपर्क अधिकारी रमा शर्मा यांनी अधिकृत माहिती दिली आहे.
(हेही वाचा – Maharashtra Assembly session: अजित पवारांनी घेतली फडणवीसांची खुर्ची!)
CBSE बोर्डाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, CBSE इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर होणार नाही. हा निकाल आज जाहीर होणार अशा बातम्या, मेसेज काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अधिकृतरित्या बोर्डाकडून जाहीर करण्यात आलेले नसताना प्रसारित केले जात आहेत. त्यामुळे अशा बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. सीबीएसई बोर्डाचा निकाल हा कधी, केव्हा जाहीर करण्यात येणार आहे, याची माहिती अधिकृत माध्यमाद्वारे जाहीर करण्यात येईल, असेही CBSE चे जनसंपर्क अधिकारी रमा शर्मा यांनी दिली.
Rama Sharma, PRO CBSE: Board will duly inform the date, time and arrangements to access results, through official communication. https://t.co/xnjLF4zWIL
— ANI (@ANI) May 5, 2019