परळ येथील केईएम रुग्णालयाच्या नर्सेस क्वार्टर्समध्ये सिलिंगचा भाग कोसळून संगीता चव्हाण (४०) या जेवण बनविणाऱ्या महिला कर्मचारी जखमी झाल्या. त्यांची प्रकृती ठिक असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. यंदाच्या वर्षांत ही दुसरी घटना आहे.
काय नेमके घडले?
गुरुवारी सकाळी रूग्णालय परिसरात नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते. सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास सदर नर्सेस क्वार्टर्स इमारतीच्या तळमजल्यावर सिलिंगचा काही भाग कोसळून पडला. या अपघातात संगीता चव्हाण यांच्या डोक्याला मार लागला. यावेळी इतर नर्सेस, कर्मचारी या संगीता चव्हाण यांच्या मदतीला धावल्या व त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेला रूग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी केला आहे. रूग्णालय प्रशासन फक्त त्याची केवळ डागडुजी करून आपली जबाबदारी टाळत आहे, असा गंभीर आरोप अनिल कोकीळ यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community