कांदिवली (पश्चिम) येथील नविन लिंक रोड या मार्गाचे बोरसापाडा जंक्शन पासून ते पोईसर नदी पर्यंत सेवा रस्त्यांसह कॉक्रीटीकरण आणि मारटीक डांबरीकरण करण्यात येणार आहे. मुंबई मेट्रो २ अ चे बांधकाम या मार्गावर सुरू होते. मेट्रोचे काम आता पूर्ण झाल्यानंतर खराब झालेल्या या रस्त्याच्या विकासाचे काम हाती घेण्यात येत आहे.
(हेही वाचा- ‘त्या’ विधानावर ‘मनसे’ आक्रमक, सुषमा अंधारेंची ‘महाप्रबोधन’ सभा उधळून लावणार!)
पश्चिम उपनगरे येथील आर/दक्षिण विभागातील कांदिवली (पश्चिम) येथील नविन लिंक रोड़ या मार्गाचे बोरापाडा जंक्शन पासून ते पोईसर नदी पर्यंत मुंबई महानगर विकास प्राधिकरण मार्फत मुंबई मेट्रो २ अ बांधण्याचे काम अलिकडेच पूर्ण झाले आहे. ‘मुंबई मेट्रो २ अ’च्या सुरु असलेल्या कामामुळे या भागातील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झालेली आहे. त्यामुळे स्थानिक खासदार, आमदार व माजी नगरसेवक व नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेसाठी वारंवार हा रस्ता इतर विविध कारणांमुळे खराब स्थितीत आहे.
त्यामुळे या रस्त्याच्या सेवा रस्ता समवेत कॉक्रीटीकरण, सी. सी. पॅसेज आणि मास्टीक डांबरीकरण करून सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या रस्त्याचा विकास करताना पर्जन्य जल वाहिन्या तसेच उपयोगिता सेवा (युटिलिटीज) आदींचा अंतर्भाव या कामात आहे. तसेच रस्त्याच्या कामाची गुणवत्ता उत्कृष्ट राखण्याकरिता गुणवत्ता निरीक्षक संस्था (क्यू. एम.ए.) यांची नेमणूक करण्याची तरतूद निविदेत अंतर्भूत करण्यात आली असून त्यांच्या देखरेखेखाली या रस्त्याचे काम केले जाणार आहे. या कामासाठी मागवलेल्या निविदेत एपीआय सिव्हीलकॉन ही कंपनी पात्र ठरली असून त्यांनी अंदाजित दरापेक्षा उणे २५ टक्के दराने हे काम मिळवण्यास पात्र ठरली आहे. हे रस्त्याच्या कामासाठी सुमारे साठ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.
Join Our WhatsApp Community