केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची ‘ओला’, ‘उबर’ टॅक्सी कंपन्यांना नोटीस

142

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (सीसीपीए) ने ‘ओला’ आणि ‘उबर’ या दोन्ही ऑनलाईन टॅक्सी सेवा प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या कंपन्यांना व्यवसायात गैरव्यवहार करणे तसेच, ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे.

( हेही वाचा : बेस्ट उपक्रमाचे वीजग्राहकांना आवाहन! बनावट SMS पासून सतर्क रहा)

राष्ट्रीय, ग्राहक हेल्पलाईन (NCH) कडे मिळालेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2021 ते 1 मे 2022 या एका वर्षाच्या काळात, ग्राहकांनी ‘ओला’ सेवेविरुद्ध 2 हजार 482 तक्रारी आणि ‘उबर’ विरोधात, 770 तक्रारी नोंदवल्या आहेत.

गेल्या आठवड्यात, वाहतूक सेवा देणाऱ्या ओला, उबर, रॅपिडो, मेरू कॅब्स आणि जुगनू अशा सर्व कंपन्यांच्या प्रतिनिधीसोबत झालेल्या बैठकीत त्यांना, राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनचे भागीदार व्हावे असे निर्देश देण्यात आले होते, यामुळे, ग्राहकांना उत्तम दर्जाची तक्रार निवारण सेवा उपलब्ध होईल आणि ग्राहक संरक्षण कायदा, 2019 तसेच ई-कॉमर्स अधिनियमांचे अनुपालनही करता येईल.

या नोटीसमध्ये, उपस्थित करण्यात आलेल्या महत्वाच्या मुद्यांपैकी काही मुद्दे खालीलप्रमाणे :-

सेवेतील त्रुटी. ज्यात ग्राहकांच्या मदतीसाठी असलेल्या व्यवस्थेकडून मिळणारा सुमार प्रतिसाद,ऑनलाईन पद्धतीने पैसे घेण्यास चालकांनी दर्शवलेला नकार आणि केवळ रोख पैसे देण्याचा आग्रह, अधि एकाच मार्गावर कमी दर अकरलेला असतांनाही दुसऱ्यांदा त्याच मार्गासाठी, अधिक दर आकारणे, चालकांची वर्तणूक सभ्य, व्यावसायिक नसणे आणि एसी गाडी मिळेल, अशी ग्राहकांना हमी दिली असतांनाही चालकांनी एसी लावण्यास नकार देणे, यांचा समावेश आहे.

ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा अपुऱ्या असणे. ग्राहक तक्रार निवारण क्रमांक आणि तक्रार दाखल करण्यासाठीच्या अधिकाऱ्यांचे नाव दोन्हीही या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नाही.

ग्राहकांनी बुक केलेली वाहतूक टॅक्सी सेवा किती वेळात रद्द करता येऊ शकेल, याची काहीही माहिती, याविषयी प्लॅटफॉर्म वर काहीही लिहिलेले नसतांना, ग्राहकांकडून अधिक दंड आकाराला जाणे. जर ग्राहकाने सेवा रद्द केली तर त्याला किती दंड पडेल, याची माहिती प्लॅटफॉर्मवर कुठेही ठळकपणे लिहिलेली नाही. मात्र यामुळे, जेव्हा चालक सेवा द्यायला किंवा अमुक एका ठिकाणी ग्राहकांना घेऊन जाण्यास उत्सुक नसतात, दिरंगाई करतात, अशावेळी त्यांच्या अशा गैरवर्तणूकीमुळे सेवा रद्द केल्यास, त्याचा भुर्दंड ग्राहकांना विनाकारण भरावा लागतो.

दोन वेगवेगळ्या व्यक्तींना एकाच मार्गांवरुन जात असतांना, वेगवेगळे शुल्क का अकरले जाते, आणि यासाठी कोणती पद्धत अथवा नियम (अल्गोरिदम) असतात, हे स्पष्ट करणारी कुठलीही माहीती, या प्लॅटफॉर्म वर उपलब्ध नाही.

काही अतिरिक्त सेवा घेण्याबाबत, आधीच बुकिंग करतांना टिक मार्क करण्याच्या बॉक्स (ह्या सेवा अतिरिक्त घेतल्या जाव्या याविषयी संमती देण्याचा तक्ता) मध्ये प्रत्येक वाहतूक सेवेआधी ग्राहकांची पूर्वपरवानगी न घेताच, त्याची संमती गृहीत धरणे.

सीसीपीए कडून, आयएसआय चिन्हाशिवाय विकल्या जाणाऱ्या आणि बीआयएस मानकांचे उल्लंघन करणाऱ्या वस्तू खरेदी न करण्याबाबत ग्राहकांनाही सावधगिरी आणि सुरक्षाविषयक सूचना जारी करण्यात आल्या. 6-12-2021 रोजी हेल्मेट, प्रेशर कुकर आणि स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर यांच्या संदर्भात पहिली नोटिस जारी करण्यात आली होती तर 16-12-2021 रोजी इमर्शन वॉटर हीटर, शिवण यंत्र, मायक्रोवेव ओव्हन, एलपीजीसहित स्थानिक गॅस स्टोव्ह इत्यादींसंदर्भात दुसरी नोटिस जारी केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.