भारताला सक्षम करण्यासाठी ‘आत्मनिर्भर भारत’चा नारा देण्यात येत आहे. भारताचे इतर देशांवरील अवलंबित्व कमी करुन सर्वच क्षेत्रांत भारताला अग्रेसर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पण स्वातंत्र्याच्या पूर्वी सुद्धा एका भारतीयाच्या पुढाकाराने देशात पहिली स्वदेशी बँक उभारण्यात आली. ज्या बँकेचं नाव होतं, सेंट्रल बँक ऑफ इंडिया.
(हेही वाचाः 1 मे 1960 ला महाराष्ट्रापासून कसं वेगळं झालं गुजरात? वाचा)
पहिली स्वदेशी बँक
इंग्रजांच्या काळात भारतात बँकिंग क्षेत्राने पायाभरणी करायला सुरुवात केली. त्याचवेळी भारतात स्वदेशीची चळवळ मोठ्या प्रमाणावर सुरू होती. त्यामुळे भारतात एक स्वदेशी बँक स्थापन करण्याची कल्पना सर सोराबजी पोचखानवाला यांच्या मनात आली. याच कल्पनेतून सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही बँक 1911 साली स्थापन झाली. मुख्य म्हणजे या बँकेतील सर्व कर्मचारीही भारतीयच होते. या वैशिष्ट्यामुळे त्यावेळी या बँकेची पहिली स्वदेशी बँक अशी ओळख निर्माण झाली. या बँकेची मुख्य शाखा मुंबईतील हुतात्मा चौक येथे आहे.
(हेही वाचाः भारतातल्या पहिल्या रेल्वेतून प्रवास करणारा पहिला भारतीय कोण? माहीत आहे का?)
पहिले अध्यक्ष
सर फिरोजशहा मेहता हे या बँकेचे पहिले अध्यक्ष होते. फिरोजशहा मेहता यांचे मुंबईच्या जडणघडणीत मोलाचे योगदान आहे. मेहता हे त्यावेळी देशातील स्वदेशी चळवळीचे मुख्य प्रणेते होते. फिरोजशहा मेहता हे मुंबई महापालिकेचे आयुक्त देखील होते. मुंबई महापालिका मुख्यालयाबाहेर फिरोजशहा मेहता यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.
(हेही वाचाः युद्धातही देशाच्या मदतीला धावून आली होती ‘एसटी’)
देशाची मालमत्ता
ही बँक हे आपलं स्वप्न होतं. ही बँक माझी नाही तर या देशाची मालमत्ता असल्याचे त्यावेळी सोराबजी पोचखानवाला यांनी म्हटले होते. या बँकेचा पोस्टाचा स्टँपही तयार करण्यात आला होता.
(हेही वाचाः महाराष्ट्रात तयार झालेत ‘दहा’ नवीन जिल्हे, कोणते? वाचा)
1969 साली सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. या बँकेच्या देशातील सर्व राज्यांत शाखा आहेत. या बँकेच्या सध्या देशभरात 5 हजारच्या दरम्यान शाखा आहेत.
Join Our WhatsApp Community