केंद्राची मोठी कारवाई; ७ भारतीय तर, एका पाकिस्तानी YouTube चॅनेलवर बंदी

138

केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने युट्यूब चॅनल्सवर पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला आहे. सरकारने राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित प्रचार प्रसार करणाऱ्या 8 यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत. यामध्ये 7 भारतीय आणि एका पाकिस्तानी यू ट्यूब चॅनेलचा समावेश आहे.

(हेही वाचा – नाशिक मध्यवर्ती कारागृहात १०-१२ कैद्यांचा हल्ला! पोलीस अधिकारी गंभीर जखमी)

या सर्व चॅनल्सवर माहिती तंत्रज्ञान कायद्याचा नियम 2021 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ब्लॉक यूट्यूब चॅनेल 114 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिले गेले असून, या चॅनेलचे 85 लाख 73 हजार सदस्य आहेत. गेल्या 21 डिसेंबरपासून भारताविरोधात मजकूर प्रसारित करणाऱ्या 102 यू ट्यूब चॅनेल ब्लॉक करण्यात आले आहेत. यापूर्वी 25 एप्रिल 2022 रोजी मोदी सरकारने 16 यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले होते. त्या चॅनेल्समध्ये 10 भारतीय आणि 6 पाकिस्तान आधारित चॅनेल होते. हे चॅनेल आयटी नियम 2021 अंतर्गत ब्लॉक करण्यात आले होते.

यापूर्वी केंद्र सरकारने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या प्रचारात गुंतलेल्या पाकिस्तानमधील 4 यूट्यूब न्यूज चॅनेलसह 22 यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले होते. दरम्यान, हे चॅनेल्स तात्काळ प्रभावाने ब्लॉक करण्यात आल्या आहेत. भारताविरोधात अपप्रचार करणाऱ्या अशा वाहिन्यांवर पुढील कारवाई केली जाईल, असे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.