तुम्हाला जर नवा नंबर हवा असेल तर तुम्ही नव सिम कार्ड घेण्यासाठी काय करायचे…. तुम्ही एखाद्या सिम कार्ड मिळणाऱ्या स्टोअरवर जायचे, तिथे गेल्यावर एखादं ओळखपत्र दाखवल्यानंतर तुम्हाला लगेच सिम कार्ड उपलब्ध होत होते. इतकेच नाही तर हे मिळाल्यानंतर ते पुढच्या काही तासातच ते अॅक्टिव्हेट देखील होत होते. मात्र आता तसे होणार नाही. केंद्र सरकराने या संदर्भातील काही नियमांमध्ये बदल केल्याचे सांगितले जात आहे.
सिम खरेदी करणं आता अधिक सोयिस्कर
या बदललेल्या नियमानुसार, आता अशा पद्धतीने सिम कार्ड सहज खरेदी करता येणार नाही. कारण सरकारने सिमकार्डशी संबंधित काही नियमांमध्ये बदल केला असून काही ग्राहकांसाठी सिमकार्ड खरेदी करणं आता पहिल्यापेक्षा अधिक सोयिस्कर होणार आहे. तर काही लोकांना थोड्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
सिम घेण्यास ऑनलाईन अर्ज करता येणार
आता सिम कार्ड घेण्यासाठी ग्राहकांना ऑनलाईन अर्ज देखील करता येणार आहे. त्यानंतर हे सिमकार्ड त्या ग्राहकांना घरी डिलिव्हर देखील करण्यात येणार आहे. आता कंपनी सिम कार्ड १८ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या खरेदी करता येणार नाही. त्यामुळे १८ वर्षांवरील वय असलेले ग्राहक आधार किंवा डिजिलॉकरमध्ये स्टोअर असलेल्या कुठल्याही डॉक्युमेंटसह आपल्या नव्या सिमकार्डसाठी स्वतःला व्हेरिफाय करू शकतो.
(हेही वाचा -ठाकरे सरकार फक्त झोपा काढतंय अन् टाईमपास करतंय, फडणवीसांचा हल्लाबोल)
जर कोणतीही व्यक्ती मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीला नवे सिम कार्ड खरेदी करता येणार नाही. जर अशी कुणी व्यक्ती नियमांचे उल्लंघन करताना सापडली तर सिम विकणाऱ्या दूरसंचार कंपनीला दोषी मानले जाऊन त्यावर कारवाई करण्यात येईल. नव्या नियमांनुसार, ग्राहकांना नव्या मोबाईल कनेक्शनसाठी UIDAI च्या आधार बेस्ड ई-केवायसी सर्व्हिसच्या माध्यमातून सर्टिफिकेशनसाठी केवळ १ रुपयांचा भरणा करावा लागेल.
Join Our WhatsApp Community