जम्मू-काश्मिरमध्ये सुरु बर्फवृष्टी, पंजाब, राजस्थान ते अगदी गुजरात मध्यप्रदेशापर्यंत सुरु असलेल्या थंडीच्या लाटेचा प्रभाव राज्यावर सलग तिस-या दिवशीही कायम होता. उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागांत मंगळवारी सकाळीच शेकोटी पेटल्या. गारठा कायम राहणार असल्याने थंडीच्या मोसमाचा आनंद लुटण्यात यंदाचा आठवडा पुढे सरकणार असल्याचे चित्र आहे. मात्र उद्या मध्य महाराष्ट्रात अतीथंडीच्या लाटेची परिस्थिती राहील, असा इशारा केंद्रीय वेधशाळेने दिला आहे. तर पुढच्या ३८ तासांत उत्तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागातही थंडीची लाट येईल आणि थंडीचा दिवस राहील असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे.
राज्यात सलग तिस-या दिवशीही गारठा कायम; केंद्रीय वेधशाळेने दिला इशारा
सौजन्य – मुंबई प्रादेशिक हवामान खाते@MahaEnvCC @Indiametdept pic.twitter.com/UtauBXjRJe— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) January 25, 2022
(हेही वाचा – उच्च न्यायालयाचा दिलासा! MPSC च्या 86 परीक्षार्थींना 29 जानेवारीची परीक्षा देता येणार)
मंगळवारी बहुतांश भागांत किमान तापमानही दहा अंशापर्यंत खाली सरकले. काही ठिकाणी दहा अंशाच्या खालीही किमान तापमानाची नोंद झाली. नाशकात चक्क किमान तापमान ६.३ अंशापर्यंत खाली घसरले. राज्यात सर्वात कमी तापमान आज नाशकात नोंदवले गेले. त्याखालोखाल अहमदनगरला ७.९ अंश सेल्सिअस, जळगावात ८.६ अंश सेल्सिअस, पुण्यात ८.५ महाबळेश्वर, मालेगाव आणि चिखलदरा येथे ८.८ अंश सेल्सिअस, बुलडाणा ९.२ अंश सेल्सिअसर, उस्मानाबाद ९.६ अंश सेल्सिअस, बारामतीत ९.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
किमान तापमानाचा सोलापूरात नवा रॅकोर्ड
मुंबईत किमान तापमान १३.४ अंश सेल्सिअस, रत्नागिरीत १४.१ अंश सेल्सिअस, नांदेडला १३.२ अंश सेल्सिअस, कोल्हापूरात १३.८ अंश सेल्सिअस, जालन्यात ११ अंश सेल्सिअस, डहाणू १३.९ अंश सेल्सिअस, परभणीत १०.८ अंश सेल्सिअस, माथेरातनमध्ये १० अंश सेल्सिअस, साता-यात १४ अंश सेल्सिअस, परभणीत १६.७ अंश सेल्सिअस, सांगलीत १३.५ अंश सेल्सिअस, नागपूरात १०.६ अंश सेल्सिअस, अकोल्यात ११ अंश सेल्सिअस, अमरावतीत १०.८ अंश सेल्सिअस, ब्रह्मपुरीत १२.४ अंश सेल्सिअस, चंद्रपूरात १३.२, गडचिरोलीत १३, गोंदियात १०.२, वर्ध्यात ११.५, यवतमाळमध्ये १०.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सोलापूरात तीन वर्षानंतर पहिल्यांदाच किमान तापमान ११.२ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. त्यामुळे मंगळवारच्या किमान तापमानाचा सोलापूरात नवा रॅकोर्ड झाला.
थंडीचा दिवस वेधशाळा कधी जाहीर करते
संबंधित भागात थंडी वाढल्यानंतर किमान तापमान 10 अंशाने आणि कमाल तापमान साडेचार किंवा 6.4 अंशाने खाली सरकल्यास वेधशाळा ‘थंडीचा दिवस’ जाहीर करते.
Join Our WhatsApp Community