वाडीबंदर येथे मध्य रेल्वेचे फुलपाखरू उद्यान

वाडीबंदरमधील पूर्वीच्या डंपिंग ग्राउंडच्या ठिकाणी आता नंदनवन बनवलं जात आहे. या डम्पिंग ग्राऊंडच्या ठिकाणी विशिष्ट फुलांची बाग बनवली गेली आहे. फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी विशिष्ट प्रजातीच्या फुलांच्या बागेत याचे रूपांतर केल्याने धोक्यात आलेल्या फुलपाखरांच्या प्रजातींचे संवर्धन आणि संरक्षण करण्याचा एक सकारात्मक प्रयत्न मध्य रेल्वेच्या वतीने केला जात आहे. वाडीबंदर येथे फुलपाखरू उद्यानाची संकल्पना मुंबई विभागात, मध्य रेल्वेवर प्रथमच राबवत आहे.

( हेही वाचा : बेस्ट कामगारांची भोजन व्यवस्था पूर्वीप्रमाणे करा; अन्यथा भाजपने दिला आंदोलनाचा इशारा)

“गो शून्य” या एनजीओच्या समन्वयाने मुंबई विभागाने सुमारे २००० चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेल्या वाडीबंदर येथील नवीन कोचिंग कॉम्प्लेक्सजवळ असलेल्या या बटरफ्लाय गार्डनमध्ये बनवले आहे. ज्यात डार्क ब्लू टायगर (तिरुमाला लिम्नियास), ब्लू मॉर्मन, टाउनी राजा (कॅरेक्‍सेस बर्नार्डस), स्ट्रीप्ड टायगर (डॅनॉस जेन्युटिया), ऑर्किड टिट, कॉमन जेझेबेल (डेलियास युकेरिस), टॉनी कोस्टर (अक्रेआ व्हायोले) आणि प्रतिबंधित स्पॉटेड आणि फ्लॅट अशा ४०० हून अधिक प्रजातींच्या वनस्पतींचा समावेश आहे. चंपा, जास्वंद, तगर, अनंता, मोगरा, कणेर, लंटाना, जमैकन स्पाइन, कामिनी, लिली, अबोली इत्यादी वनस्पतींच्या प्रजाती फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी ओळखल्या जातात.

मुंबईत फुलपाखरांच्या १५० प्रजाती आढळतात. अन्न उत्पादन चक्रातील एक महत्त्वाचा घटक म्हणून फुलपाखरू ही निसर्गाची सर्वोत्तम रंगीत निर्मिती आहे. फुलपाखरू उद्यान हे अशा वनस्पतींचे संयोजन आहे,जे फुलपाखराला त्याच्या जीवनचक्राद्वारे आतिथ्य करू शकतात आणि फुलांपासून अमृतही (मध) देऊ शकतात. फुलपाखरांसाठी अनेक देशी आणि सुवासिक प्रजातींच्या फुलपाखरांच्या वनस्पती असलेले फुलपाखरू उद्यान निसर्गप्रेमींसाठीही एक पर्वणी आहे. उत्साही वातावरण देण्यासाठी या गार्डनमध्ये जेट वॉटरिंग सुविधाही आहे.

हर्बल गार्डन आणि मियावकी गार्डन

हरित वसुंधरेच्या दिशेने केलेल्या योगदानाचा एक भाग म्हणून, मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि इगतपुरी येथे हर्बल गार्डन्स आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे मियावाकी फॉरेस्टची निर्मिती केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि इगतपुरी येथील वनौषधी उद्यान आणि इगतपूरी येथे सुमारे १२० आणि ४७० हून अधिक विविध प्रजातींच्या वनौषधी आणि झुडपांचा संग्रह आहे. ज्यात अश्वगंधा, अडुसा, अजवाईन, अपमार्ग, ब्राम्ही, इलाची, मेन्थॉल मिंट, मिरपूड, शतावरी, तुळशी, अंजीर, हळद, इन्सुलिन, गुडमार, तेजपट्ट, ब्रिंगराज, सरपा गंधा, गिलोई, लवंग इत्यादी सारख्या वनौषधींचा समावेश असून या अनेक रोग आणि आजारांवर प्रभावी उपायी आहेत.

मध्य रेल्वेने मुंबई विभागात लोकमान्य टिळक टर्मिनस येथे २५० चौरस मीटर क्षेत्रफळावर १००० मियावाकी वृक्षारोपण उपक्रम हाती घेतला आहे. मियावाकी ही एक वेगाने वाढणारी दाट वृक्षारोपण प्रणाली आहे ज्यामध्ये प्रति चौरस मीटर सुमारे ३ ते ४ रोपे लावली जातात. जैव-विविधता सुधारण्याव्यतिरिक्त, ही झाडे ऑक्सिजनची पातळी वाढवण्यास आणि वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यास देखील मदत करतात आणि वातावरणातील बदलांना तोंड देण्यासाठी आणि कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी हा आणखी एक पर्यावरणीय उपक्रम आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here