मध्य रेल्वेने २०२२ – २३ या आर्थिक वर्षाची सुरुवात सकारात्मक पद्धतीने केली आणि एप्रिल २०२२ मध्ये अनेक कमोडिटीजमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम लोडिंग केली. मध्य रेल्वेने एप्रिल २०२२ मध्ये ७.१४ दशलक्ष टन मालवाहतुक करून आपली एप्रिल मधील आतापर्यंतची सर्वोत्तम फ्रेट लोडिंग साध्य केली. ही वाढ एप्रिल २०२१ मधील ६.२५ दशलक्ष टन मालवाहतुकीच्या तुलनेत १४.२% अधिक असून आतापर्यंतचा ‘हा’ सर्वोत्तम विक्रम मानला जात आहे.
मध्य रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच नागपूर विभागातील बल्हारशाह येथून लोहखनिज भरण्यास सुरुवात झाली. एप्रिल २०२२ मध्ये मध्य रेल्वेने लोहखनिजाचे ३५ रेक लोड केले. नागपूर विभागाने एप्रिल २०२२ मध्ये ९५४ कोळशाचे रेक लोड केले जे एप्रिल २०२१ मध्ये ७९९ रेक होते.
(हेही वाचा – नवाब मलिक तुरूंगातून जेजे रूग्णालयाच्या ICU मध्ये दाखल, प्रकृती स्थिर)
मध्य रेल्वेने एप्रिल २०२१ मध्ये ३१ रेकच्या तुलनेत एप्रिल २०२२ मध्ये ऑटोमोबाईल्सचे ६६ रेक लोड केले. एप्रिल २०२१ मध्ये अन्नधान्याच्या १४ रेक मालवाहतुकीच्या तुलनेत एप्रिल २०२२ मध्ये ६१ अन्नधान्याचे रेक लोड केले गेले. एप्रिल २०२२ मध्ये साखरेचे १०९ रेक लोड केले गेले जे एप्रिल २०२१ मध्ये ८६ रेक होते. त्याचप्रमाणे, एप्रिल २०२२ मध्ये स्टीलचे ९६ रेक लोड केले गेले जे एप्रिल २०२१ मध्ये स्टीलचे ८० रेक होते.
मध्य रेल्वेने एप्रिल २०२१ मधील शून्य रेकच्या तुलनेत एप्रिल २०२२ मध्ये जिप्समचे ४ रेक आणि फ्लाय ऍशचे ८ रेक लोड केले. अनिल कुमार लाहोटी, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणाले की, मध्य रेल्वे हे प्रगतीच्या चाकातील एक महत्त्वाचे सहभागी आहे आणि आगामी काळात अधिक साध्य करण्याच्या रेल्वेच्या प्रयत्नात योगदान देत आहेत.
Join Our WhatsApp Community