मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे. ठाणे ते दिवा पाचव्या, सहाव्या मार्गिकेमुळे मध्य रेल्वेवर ३६ नव्या लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
(हेही वाचा – “खोटं, बेशरमपणे बोलणं, रोज उठल्यानंतर आपलं गटार उघडायचं हे राऊतांचे धंदे” )
रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या पाचव्या, सहाव्या मार्गिकेचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी १८ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे होणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील. त्यावेळी वाढीव फेऱ्याही सेवेत दाखल होणार आहे. सीएसएमटी ते कल्याण मार्गावर सध्या १० वातानुकूलित लोकल फेऱ्या होतात. नव्या ३४ फेऱ्यांची भर पडणार असल्याने या मार्गावरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ४४ होईल. तर सीएसएमटी ते पनवेल, गोरेगाव हार्बरवर वातानुकूलित रेल्वेच्या ३२ फेऱ्या होतात. अल्प प्रतिसादामुळे त्यातील १६ फेऱ्या रद्द करून त्याऐवजी १६ विनावातानुकूलित फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे हार्बरवर फक्त वातानुकूलितच्या १६ फेऱ्याच प्रवाशांच्या सेवेत असतील.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ३६ लोकल फेऱ्या
वातानुकूलित रेल्वेला जास्तीचं भाडं असल्याने प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असतानाही वाढीव फेऱ्यांमध्ये ३४ वातानुकूलित फेऱ्यांचा समावेश करण्यात आला असून दोनच विनावातानुकूलित सामान्य फेऱ्या आहेत. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ३६ लोकल फेऱ्या वाढणार आहेत. त्यामुळे एकूण फेऱ्यांची संख्या १ हजार ७७४ वरून १ हजार ८१० होणार आहे.
Join Our WhatsApp Community