Central Railway: मुंबई-मडगाव सुपरफास्ट एकेरी विशेष ट्रेन धावणार

185

मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई ते मडगाव विशेष शुल्कासह सुपरफास्ट एकेरी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. (01099) सुपरफास्ट एकेरी विशेष गाडी बुधवारी 8 जून 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 7.50 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी मडगावला 17.30 वाजता पोहोचेल.

या रेल्वे स्थानकांवर थांबणार

दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी

गाड्यांची रचना

एक विस्टाडोम कोच, 3 वातानुकुलित चेअर कार, 10 द्वितीय श्रेणी चेअर कार, एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन

(हेही वाचा – Indian Railways New Rule: आता रेल्वेत तुमचे सामान हरवले तरी नो टेन्शन, रेल्वेने सुरू केली भन्नाट सुविधा)

तिकीट आरक्षण कधी कराल

01099 सुपरफास्ट वन-वे स्पेशल ट्रेनसाठी विशेष शुल्कासह बुकिंग 4 जून 2022 रोजी सर्व आरक्षण केंद्रावर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरु होईल. वरील ट्रेनचे 4 द्वितीय श्रेणी चेअर कार आणि एक द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन डबे अनारक्षित डबे म्हणून धावतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.