मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली, ठाणे स्थानकात तांत्रिक बिघाड

153

मुंबई आणि उपनगर परिसरात मंगळवारी रात्रीपासून पाऊस पडत असल्याने त्याचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. बुधवारी देखील पावसाच्या संततधारेमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गाच्या रेल्वे सेवेवरही त्याचा परिणाम झाल्याचे समोर आले आहे. मध्य, हार्बर मार्गावरील लोकल सकाळपासूनच उशिराने धावत असताना आता मध्य रेल्वे स्थानकावरील ठाणे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळतेय. हा तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक २० मिनिटे उशिराने धावत असून सीएसटीएमच्या दिशेने जाणारी रेल्वे २० मिनिटं जागीच थांबून असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा सकाळीच खोळंबा झाल्याचे दिसून आले आहे.

(हेही वाचा – एकनाथ शिंदेंचं गुरुपौर्णिमेनिमित्त सूचक ट्वीट म्हणाले, “बाळासाहेबांच्या….”)

लोकलचा वेग मंदावला

मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे मुंबईच्या मध्य उपनगरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे मुंबईची लाईफ लाईन असणाऱ्या लोकलचा वेग मंदावला आहे. त्यामुळे रेल्वे लोकलचं वेळापत्रक देखील कोलमडलं असून प्रवाशांना त्यांचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबईसह दक्षिण मुंबईत देखील पावसाचा जोर कायम आहे. यामुळे सखोल भागात पावसाचे पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. तर माहीम, दादर, परळ, भायखळा भागांत जोरदार पाऊस कोसळत असून मुंबईला पुढील दोन दिवस हवामान विभागाकडून पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. सकाळपासून कोसळत असलेल्या पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. या वाहतूक कोंडीमुळे वाहनं संथगतीने धावताना दिसत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.