वर्ष 2022-23 च्या आर्थिक वर्षाची सुरुवात एप्रिल आणि मे 2022 महिन्यामध्ये भाडे व्यतिरिक्त महसूल (नॉन-फेअर रेव्हेन्यू) मध्ये रु.8.69 कोटी, पार्सल कमाईमध्ये रु.44.64 कोटी आणि तिकीट तपासणीमध्ये रु.71.61 कोटींच्या विक्रमी कमाईसह होते.
सर्व प्रामाणिक रेल्वे प्रवाशांना आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा सुनिश्चित करण्यासाठी, मध्य रेल्वे विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी उपनगरीय, मेल एक्सप्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी करते.
मध्य रेल्वेची विक्रमी कमाई
एप्रिल आणि मे – 2022 या महिन्यात, मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाने रु.71.61 कोटी तिकीट तपासणी महसूल मिळवला आहे, जो एप्रिल आणि मे-2021 मध्ये रु. 21.67 कोटींच्या तुलनेत 230.46% ची वाढ दर्शविते. त्याचप्रमाणे तिकीट तपासणी प्रकरणांच्या बाबतीत, एप्रिल आणि मे-2022 मध्ये 10.11 लाख प्रकरणे आढळून आली, तर एप्रिल आणि मे-2021 मध्ये 3.19 लाख प्रकरणे आढळून आली जी 216.74% ची वाढ दर्शविते.
( हेही वाचा: महाराष्ट्राला मिळणार पहिली ‘वंदे भारत’ ट्रेन; आता मुंबई- पुणे प्रवास फक्त अडीच तासांत )
वैध तिकीट घेऊन प्रवास करा
भाडे व्यतिरिक्त महसूल या संकल्पनेसह मध्य रेल्वेने एक वेगळी यशोगाथा तयार केली आहे. हायब्रीड ऑन बोर्ड हाउस कीपिंग सर्विस कॉन्ट्रॅक्ट्स, डिजिलॉकर, पर्सनल केअर सेंटर्स, ई-बाईक, ई-चार्जिंग पॉइंट्स, मागणीनुसार सामग्री, संभाषणे ऑन द मूव्ह इ यांसारख्या भाडे व्यतिरिक्त महसूलाच्या विविध संकल्पनांच्या माध्यमातून प्रवाशांसाठी उत्तम आणि आधुनिक सुविधांच्या संयोजनासह रेल्वेच्या महसुलात वाढ करण्याचे उत्तम उदाहरण ठेवले आहे. प्रवाशांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊन सन्मानाने प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वे करते.
Join Our WhatsApp Community