मध्य रेल्वेकडून पर्यटकांसह प्रवाशांना दिलासा दिला असून त्यांना सर्वाधिक उन्हाळी विशेष गाड्यांची भेट दिली आहे. मध्य रेल्वेने उन्हाळ्यातील प्रवाशांची सतत वाढती मागणी लक्षात घेता मध्ये रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. यंदा मध्य रेल्वेने आपल्या सध्या सुरू असलेल्या गाड्यांव्यतिरिक्त मध्य रेल्वेतून सुरू होणाऱ्या ६२६ उन्हाळ्यातील विशेष गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. या ६२६ उन्हाळ्यातील विशेष गाड्यांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस आणि शालिमार, बलिया, गोरखपूर, मऊ, समस्तीपूर, बनारस, तसेच थिवीदरम्यान ३०६ उन्हाळ्यातील विशेष गाड्या असून, त्यामध्ये २ शिक्षक विशेष गाड्यांचा समावेश आहे.
एप्रिल ते जूनमध्ये या ६२६ उन्हाळी विशेष गाड्या धावणार
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मनमाड, नागपूर, मालदा टाऊन, तसेच रिवादरम्यान उन्हाळ्यातील २१८ विशेष गाड्या आहेत. पुणे आणि करमळी, जयपूर दानापूर, वीरांगणा लक्ष्मीबाई स्टेशन, तसेच कानपूर सेंट्रलदरम्यान उन्हाळ्यात १०० विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. वर्ष २०२१ आणि २०१९ मध्ये, उन्हाळ्यातील विशेष गाड्यांची संख्या अनुक्रमे ४३५ आणि ५४० होती, तर २०२० मध्ये कोरोनामुळे उन्हाळ्यात विशेष गाड्या चालविण्यात आल्या नाहीत. एप्रिल ते जून २०२२ मध्ये या ६२६ उन्हाळी विशेष गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई / दादर / लोकमान्य टिळक टर्मिनस / पनवेल / पुणे / नागपूर/साईनगर शिर्डीसारख्या स्टेशनपासून विविध गंतव्यस्थानाकरिता चालविण्यात येत आहेत.
(हेही वाचा – मुंबईत २४ तास धावणाऱ्या लोकलची ‘अशी’ होते देखभाल)
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरेकडील आणि पूर्वेकडील रेल्वेकरिता प्रचंड मागणी लक्षात घेता, सामान्य द्वितीय श्रेणीचे जास्तीत जास्त डबे विविध उन्हाळी विशेष गाड्यांना संलग्न केले जात आहेत. आधीच संलग्न असलेल्या सामान्य द्वितीय श्रेणीच्या डब्यांव्यतिरिक्त, मध्य रेल्वेने बलिया आणि गोरखपूर उन्हाळी विशेष गाडीला दोन सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे वाढविण्याची घोषणा केली आहे. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस १० मे ते ३० जूनपर्यंत उन्हाळी विशेष गाडीचे डबे वाढविले जाणार आहे, तर लोकमान्य टिळक टर्मिनस बलिया- लोकमान्य टिळक ११ मे ते २९ जूनपर्यंत उन्हाळी विशेष गाडीचे डबे वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community