मध्य रेल्वेचा विशेष Traffic Block; बघा कोणत्या गाड्या रद्द

109

मध्य रेल्वे भुसावळ विभाग इगतपुरी येथील टिटोली यार्डमध्ये इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी 23 मे 2022 ते 31 मे 2022 या कालावधीदरम्यान, मध्य रेल्वेकडून विशेष ट्राफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. 31 मे 2022 रोजी टिटोली यार्ड येथे 05.15 ते 11.15 पर्यंत विशेष ब्लॉक असणार आहे. या कामामुळे मध्य रेल्वेच्या मार्गावरील काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात येणार आहेत तर काही रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

(हेही वाचा – मुंबई लोकलच्या Odd वेळांमागचं गणित माहीत आहे का?)

 या गाड्या पुनर्निर्धारित वेळेनुसार धावतील

28 मे 2022 ते 02 जून 2022 हे 6 दिवस 02102/02101 मनमाड-मुंबई-मनमाड उन्हाळी विशेष रेल्वे रद्द करण्यात येणार आहे तर 31 मे 2022 रोजी पुढील गाड्या पुनर्निर्धारित वेळेनुसार धावतील. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 10.55 वाजता सुटणारी 11059 छपरा एक्सप्रेस 12.15 वाजता सुटेल,सीएसएमटीहून 11.05 वाजता सुटणारी 82356 मुंबई पटना एक्स्प्रेस 13.00 वाजता आणि पनवेलहून सुटणारी 11061 गोरखपूर एक्सप्रेस 15.50 वाजता 20.30 वाजता सुटणार आहे. तर 31 मे 2022 रोजी 12071 मुंबई-जालना जनशताब्दी एक्सप्रेस,
12072 जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस रद्द करण्यात येणार आहे.

रेल्वे प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार, 28 मे 2022 रोजी डाऊन गाड्यांचे नियमन

  • 11059 लोकमान्य टिळक टर्मिनस- छपरा एक्सप्रेस
  • 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस- जयनगर एक्सप्रेस

(हेही वाचा – परशुराम घाटातील वाहतूक उद्यापासून नियमित सुरु होणार)

28 मे 2022 रोजी येणार्‍या अप गाड्यांचे नियमन

  • 12072 जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस
  • 12142 पाटलीपुत्र – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  • 15065 गोरखपूर – पनवेल एक्सप्रेस
  • 12520 – कामाख्या – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  • 15018 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  • 12335 भागलपूर -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

28 मे 2022 ‘या’ गाड्यांचे रिशेड्युलिंग

12141 लोकमान्य टिळक टर्मिनस- पाटलीपुत्र एक्सप्रेस 28 मे 2022 लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 29 मे 2022 रोजी 4.30 वाजता सुटणार आहे. 15066 पनवेल-गोरखपूर एक्सप्रेस 28 मे 2022 रोजी त्याच दिवशी 18.30 वाजता पनवेलहून सुटणार असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.