मध्य रेल्वे जवळपास 20-25 मिनिटे उशिराने धावत आहे. मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा आणि कळवा या स्थानकादरम्यान बांधण्यात आलेल्या नव्या खाडी पुलावरुन धिम्या लोकलची वाहतूक सोमवारपासून सुरु झाली आहे. हा नवा रेल्वे ट्रॅक असल्यामुळे लोकलचा वेग चांगलाच मंदावला आहे. त्यामुळे जवळजवळ आठवडाभर ही परिस्थिती असण्याची शक्यता असल्याने, जर आपण मध्य रेल्वेचे प्रवासी असाल, तर या आठवड्यात तुम्हाला जवळजवळ 15-20 मिनिटे घरातून आधी निघावे लागणार आहे.
म्हणून ट्रेन धिम्या वेगाने धावतायत
परवानगी मिळाल्यानंतर या नव्या ट्रॅकवरुन लोकल धावण्यासाठी सज्ज झाली आहे. पण, ट्रॅक नवीन असल्याने या लोकलचा वेग बराच मंदावला आहे. तसेच रेल्वेचे काही स्टॅंडर्ड असतात, त्यानुसार एखाद्या नव्या बनवलेल्या मार्गावरुन ट्रेन सुरु केली असता, ट्रेनसाठी आखून दिलेल्या वेगानुसारच ट्रेन त्या नव्या मार्गावरुन धावत असते आणि म्हणूनच मुंब्रा आणि कळवा दरम्यान धावणा-या लोकल या अतिशय धिम्या वेगाने धावत आहेत.
( हेही वाचा: मुंबई महापालिका सज्ज! आजपासून 9 केंद्रांवर बच्चे कंपनीला मिळणार कोरोना लस)
प्रवाशांचा खोळंबा
त्याचा परिणाम हा मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर झालेला दिसून येत आहे, म्हणून डोंबिवली, कल्याण, कर्जत आणि कसारा येथून धिम्या ट्रॅकवर धावणा-या लोकल विलंबाने धावत आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील लोकल विलंबाने धावत असल्याने प्रवाशांचा मात्र खोळंबा झाला आहे.
Join Our WhatsApp Community