मध्य रेल्वेने केला जानेवारीत आतापर्यंतचा ‘हा’ सर्वोत्तम विक्रम

135

जानेवारी-२०२२ मध्ये मध्य रेल्वेची मालवाहतूक ७ दशलक्ष टन झाली, जी जानेवारी-२०२१ मध्ये ६.१६ दशलक्ष टन होती, त्यात तब्बल १३.६ टक्के वाढ झालेली आहे.

एप्रिल-२०२१ ते जानेवारी-२०२२ या कालावधीत, मध्य रेल्वेची मालवाहतूक ६२.०५ दशलक्ष टन झाली जी मागील वर्षीच्या याच कालावधीत ४९.१५ दशलक्ष टन लोड होती. ही मालवाहतूक कोणत्याही एप्रिल-जानेवारी कालावधीत आतापर्यंतची सर्वाधिक आहे. मागील सर्वोत्तम मालवाहतूक एप्रिल-जाने २०१८-१९ या कालावधीत ५२.०२ दशलक्ष टन होती. नागपूर विभाग जानेवारी-२०२२ मध्ये ४.२२ दशलक्ष टन आणि एप्रिल-२०२१ ते जानेवारी-२०२२ या कालावधीत ३६.०७ दशलक्ष टन लोडिंगसह आघाडीवर आहे. त्यानंतर मुंबई विभाग जानेवारी-२०२२ मध्ये १.४३ दशलक्ष टन आणि १३.९० (एप्रिल-२०२१ ते जानेवारी-२०२२) दशलक्ष टन लोडिंगसह आघाडीवर आहे.

(हेही वाचा – रविंद्र वायकर, राहुल शेवाळेंच्या यादीत आता यशवंत जाधवांना स्थान, कसे ते जाणून घ्या)

कोळशाची मालवाहतूक जानेवारी-२०२२ मध्ये ३.४३ दशलक्ष टन आणि एप्रिल-२०२१ ते जानेवारी-२०२२ या कालावधीत ३३.४३ दशलक्ष टन लोडिंगसह सर्वाधिक, त्यानंतर कंटेनर्सची जानेवारी-२०२२ मध्ये ०.८३ दशलक्ष टन आणि एप्रिल-२०२१ ते जानेवारी-२०२२ या कालावधीत ८.०७ दशलक्ष टन झाली. अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक म्हणाले की, या जास्त मालवाहतुकीचे श्रेय मुख्यत्वे मध्य रेल्वेने क्षेत्रीय आणि विभागीय स्तरावर उभारलेल्या व्यवसाय विकास युनिट्स (BDUs) द्वारे घेतलेल्या पुढाकारांमुळे आहे. त्यांनी असेही सांगितले की, रेल्वेद्वारे मालवाहतूक हा ग्राहकांसाठी उपलब्ध सर्वात सुरक्षित, जलद आणि पर्यावरणपूरक पर्याय आहे आणि मध्य रेल्वे मालवाहतुकीच्या कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी सर्व संभाव्य मार्गांचा शोध घेत आहे.

जानेवारी-२०२२ मधील उल्लेखनीय मालवाहतूक 

• जानेवारी २०२१ मधील ७५४ रेक मालवाहतूकीच्या तुलनेत नागपूर विभागाकडून ९२० रेकचे आतापर्यंतची सर्वोत्तम कोळसा मालवाहतूक झाली आहे.

• पुणे विभागाने एकूण ५४ रेकपैकी ४४ ऑटोमोबाईल्सचे रेक लोड केले.

• जानेवारी-२०२१ मध्ये १५३ रेकच्या तुलनेत सिमेंटचे १९१ रेक (क्लिंकरसह) लोड केले गेले आहेत.

• जानेवारी-२०२१ मधील ६८ च्या तुलनेत स्टीलचे ९० रेक लोड केले गेले आहेत.

• गेल्या वर्षीच्या ६८ रेकच्या तुलनेत साखरेचे ११९ रेक लोड झाले आहेत.

• कार्बन ब्लॅक फीड स्टॉकचे ६ रेक (CBFS) लोड केले गेले आणि एप्रिल-२०२१ ते जानेवारी-२०२२ दरम्यान २२ रेक लोड केले गेले, जे गेल्या वर्षी शून्य होते.

• गेल्या वर्षीच्या शून्याच्या तुलनेत जानेवारी-२०२२ मध्ये जिप्समचे ८ रेक तसेच एप्रिल-२०२१ ते जानेवारी-२०२२ या कालावधीत जिप्समचे १० रेक लोड केले गेले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.