मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याची माहिती मिळत आहे. मध्य रेल्वे मार्गावरील भायखळा रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे गुरूवारी दुपारी १२ वाजेपासून मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.
(हेही वाचा – “तुमच्या स्क्रिप्टरायटरला क्रिएटिव्हिटी वाढवायला सांगा, कारण…”, फडणवीसांचा ठाकरेंच्या भाषणावर खोचक टोला!)
या तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान दीड तास उलटून गेल्यानंतरही हा तांत्रिक बिघाड दुरूस्त झाला नसून त्याचे कारणही अद्याप अस्पष्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भायखळ्यातील या तांत्रिक बिघाडामुळे धीम्या मार्गिकेवरील गाड्या जलद मार्गिकेवर वळवल्या आहेत.
दरम्यान, मध्य रेल्वेवरील वाहतूक दुपारी १२ वाजेपासून विस्कळीत झाल्याने सीएसएमटीकडे जाणारी धिमी मार्गिका प्रभावित झाली आहे. जरी हा गर्दीचा वेळ नसला तरी देखील प्रवाशांचा खोळंबा होत आहे. सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्व धीम्या लोकल या बिघाडामुळे एका मागे एक थांबून होत्या. मात्र काही वेळानंतर या लोकस जलद मार्गावर वळण्यात आल्या यानंतर ही वाहतूक हळू हळू जलद मार्गावरून सुरू करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community