गणेशोत्सवासाठी विशेष मेमू सेवा, ‘या’ मार्गावर धावणार ३२ गाड्या!

133

२०२२ च्या गणपती उत्सवादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे रोहा ते चिपळूण दरम्यान ३२ मेमू गाड्या चालवणार आहे. या ३२ जादा गाड्यांमुळे २०२२ मध्ये एकूण गणपती विशेष गाड्यांची संख्या १९८ होणार आहे. मेमू गणपती विशेष गाड्यांचे तपशील दिले आहेत ते खालील प्रमाणे.

(हेही वाचा – Indian Army Recruitment 2022 : भारतीय सैन्यात ‘या’ पदांवर भरती, दरमहा 2 लाखांहून अधिक पगार)

01157 मेमू

दि. १९.८.२०२२ ते २१.८.२०२२ पर्यंत, दि. २७.८.२०२२ ते ०५.९.२०२२ आणि १०.९.२०२२ ते १२.९.२०२२ (१६ सेवा) रोहा येथून दररोज ११.०५ वाजता सुटेल आणि चिपळूण येथे त्याच दिवशी १३.२० वाजता पोहोचेल.

01158 मेमू

चिपळूण येथून दि. १९.८.२०२२ ते २१.८.२०२२, दि. २७.८.२०२२ ते ५.९.२०२२ आणि १०.९.२०२२ ते १२.९.२०२२ (१६ सेवा) पर्यंत दररोज १३.४५ वाजता सुटेल आणि रोहा येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल.

असे असतील थांबे :

  • माणगांव, वीर, करंजाडी, विन्हेरे आणि खेड.

संरचना:

  • ८-कार मेमू

सुपरफास्ट मेल/एक्स्प्रेस ट्रेनसाठी लागू असलेल्या मेमू ट्रेनसाठी यूटीएस सिस्टमद्वारे तिकिटे बुक केली जाऊ शकतात. या मेमू ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट देता येईल.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.