एका वर्षांत मध्य रेल्वेच्या टिसींनी वसूल केला २१४ कोटींचा दंड!

मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणीस कर्मचार्‍यांनी एप्रिल-२०२१ ते मार्च-२०२२ या कालावधीत तब्बल ३५.३९ लाख फुकट्या प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून २१४.४१ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात वसूल करण्यात आलेला हा रेल्वेच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे.

( हेही वाचा : ‘एक राज्य एक आकाशवाणी केंद्र’ या धोरणाचा फटका )

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील सर्व क्षेत्रीय रेल्वेंमधील हा आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल आहे असून या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मध्य रेल्वेच्या २७ तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कृत करण्यात आले. ज्यात मुख्यालयातील ५,भुसावळ विभागातील ७, मुंबई विभागातील ५, पुणे विभागातील ४ आणि नागपूर व सोलापूर विभागातील प्रत्येकी ३ कर्मचारी आदींचा समावेश होता. ज्या २७ तिकीट तपासणी कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला त्यांनी हे उद्दिष्ट साध्य करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. दोन तिकीट तपासणी कर्मचार्‍यांचा त्यांच्या कर्तव्याच्या कामगिरीबद्दल वेगळा दृष्टिकोन दाखवल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला:

शुक्रवारी ५ मे२०२२ रोजी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात या सर्व २७ कर्मचाऱ्यांचा प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक मणिजीत सिंग यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (पीएस), इती पांडे, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक (आर आणि टीसी) दीपक शर्मा, आणि इतर अधिकारी देखील उपस्थित होते. सर्व बोनाफाईड रेल्वे वापरकर्त्यांना आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा सुनिश्चित करण्यासाठी आणि विनातिकीट तसेच अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे आपल्या सर्व विभागांमधील उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा, विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी केली जाते.

एक कोटीपेक्षा जास्त दंडात्मक महसूल वसूल करणारे तिकीट तपासणीस

  • -मोहम्मद सॅम्स, टीटीआय, मुंबई विभाग ( १.२५ कोटी रुपये)
  • जे. जे. दरबे, प्रमुख तिकीट परीक्षक, नागपूर विभाग ( १.०७ कोटी रुपये)
  • अभिषेक सिन्हा, टीटीआय, मुंबई विभाग, ( १.०५ कोटी रुपये)
  • धर्मेंद्र कुमार, टीटीआय, मुख्यालय, मुंबई ( १.०५ कोटी रुपये)
  • के. के. पटेल, टीई, भुसावळ विभाग, ( १.०३ कोटी रुपये)
  • सुनील नैनानी, टीटीआई, मुंबई विभाग,( १.०३ कोटी रुपये)

कर्तव्यात वेगळा दृष्टिकोन दाखवल्याबद्दल दोघांचा विशेष सत्कार

राजेंद्र काटकर, हेड ट्रॅव्हलिंग तिकीट परीक्षक, पुणे विभाग, यांनी. ८ ऑगस्ट २०२१ रोजी ट्रेन क्रमांक ०१०४० मध्ये कर्तव्य बजावत असताना, २ वर्षाच्या मुलावर कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (सीपीआर) केले आणि त्याचे प्राण वाचवले.

एस के दुबे, मुख्य तिकीट निरीक्षक, मुंबई विभाग, यांनी ट्रेन क्रमांक १२२९४ दुरांतो एक्स्प्रेसमध्ये तिकीट नसलेल्या लोकांचा समूह शोधून काढला आणि त्यांच्याकडून १७,४३५रुपयांचा दंड वसूल केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here