केंद्र सरकारची मोठी कारवाई; १५०हून अधिक युट्यूब चॅनेल्स आणि वेबसाईट्स बॅन

298
केंद्र सरकारची मोठी कारवाई; १५०हून अधिक युट्यूब चॅनेल्स आणि वेबसाईट्स बॅन
केंद्र सरकारची मोठी कारवाई; १५०हून अधिक युट्यूब चॅनेल्स आणि वेबसाईट्स बॅन

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मोठी कारवाई करत १५०हून अधिक युट्यूब चॅनेल्स आणि वेबसाईट्सवर बंदी घातली आहे. २०२१पासून सुरू असलेल्या वेबसाईट बंदीबाबत मंत्रालयाने म्हटले की, गेल्या २ वर्षांपासून भारताविरोधात मजकूर सादर केला जात असल्यामुळे ही बंदी घालण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या कलम 69Aचे उल्लंघन केल्यामुळे या वेबसाईट्स आणि चॅनेल्स काढून टाकण्यात आले आहेत.

एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘भारतविरोधी’ मजकूर बनवल्याबद्दल गेल्या २ वर्षांत १५०हून अधिक वेबसाईट्स आणि यूट्यूब आधारित न्यूज चॅनेल्स काढून टाकण्यात आले आहेत. या युट्यूब चॅनेल्सचे १२.१ दशलक्ष पेक्षा जास्त सदस्य आहेत आणि एकूण १३२४.२६ दशलक्ष पेक्षा जास्त व्ह्यू आहेत. हटवण्यात आलेल्या चॅनेल्समध्ये खबर विथ फॅक्ट्स, खबर ताईज, इन्फॉर्मेशन हब, फ्लॅश नाऊ, मेरा पाकिस्तान, हकीकत की दुनिया आणि अपनी दुनिया या युट्यूब चॅनल्सवर बंदी घालण्यात आली आहे.

(हेही वाचा – आक्षेपार्ह पोस्टमुळे कागलमध्ये तणावाचं वातावरण; पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात)

भारताच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणाऱ्या खोट्या बातम्या आणि मजकूर सादर करू नयेत यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय वेळोवेळी अनेक यूट्यूब चॅनेल्सना ताकीद देत आहे, त्यामुळे मंत्रालयाने आता एक मोठा निर्णय घेत असे चॅनेल्स हटवले आहेत. अकाऊंट लोकांची दिशाभूल करणारे काही करत असल्याचे आढळले तर त्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.