Agnipath Scheme विरोधात फेक न्यूज पसरवणं पडलं महागात, ३५ Whatsapp ग्रृपवर बंदी

124

केंद्र सरकारने सैन्य भर्तीसाठी नव्याने आणलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभर तरूणांनी आंदोलन केलीत. हरियाणा, मध्यप्रदेश, बिहार, उत्तरप्रदेश आणि दिल्लीत अग्निपथ योजनेच्या विरोधात तरुणांनी निदर्शनासह आक्रमक आंदोलनं केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, केंद्र सरकारने रविवारी ३५ व्हॉट्सअप ग्रृपवर बंदी घातली आहे.

सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेबाबत खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल तब्बल ३५ व्हॉट्सअप ग्रृपवर बंदी घालण्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर असेही सांगितले जात आहे की, सरकारविरोधात चुकीची माहिती पसरवणाऱ्या आणि हिंसेला उत्तेजन देणाऱ्यांचा शोध घेत आहे. जवळपास १० जणांना खोट्या बातम्या पसरवणे आणि तरुणाईची दिशाभूल केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपू्र्वी या योजनेची घोषणा झाल्यानंतर देशातील वेगवेगळ्या भागात हिंसक आंदोलनं अद्याप सुरू आहेत. दरम्यान, प्रेस इन्फर्मेशन ब्युरोकडून वस्तुस्थिती तपासली जात असून योजनेसंबंधित माहितीची पडताळणी केली जात आहे.

(हेही वाचा – #AgnipathScheme: केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ भरती योजने’ला तरूणांकडून का होतोय विरोध?)

वयोमर्यादा बदलण्यात आली

केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला देशभरातून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आता या योजनेत सैन्य भरतीसाठी कमाल वयोमर्यादा २३ वर्ष ठेवली आहे. यापूर्वी ही वयोमर्यादा २१ वर्ष होती. गेल्या २ वर्षांत एकही भरती झाली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. वयोमर्यादेत असलेली ही सवलत यंदाच्या पहिल्या भरतीसाठीच लागू असणार आहे.

काय आहे अग्निपथ योजना

या योजनेमुळे देशातील तरुणांना देशसेवेची संधी मिळणार आहे. या योजनेंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. अनेक देशांमध्ये अभ्यास केल्यानंतर ही योजना आणली जात आहे. या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळेल आणि चांगला पगारही मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.