देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनची दहशत आहे. कोरोना बाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता आणि ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काही राज्यात अनेक निर्बंध लावण्यात आले आहे. तसेच केंद्राने देखील सतर्क होत पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, आरोग्य मंत्र्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्राने ओमायक्रॉन रुग्ण जास्त असणाऱ्या तसंच कमी लसीकरणाचा वेग कमी असणाऱ्या राज्यांमध्ये पथकं पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. १० राज्यांमध्ये या टीम पाठवण्यात येणार आहे.
या राज्यात केंद्र पाठवणार पथक
केंद्राकडून ज्या राज्यांमध्ये पथकं पाठवणार आहेत त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. महाराष्ट्राशिवाय केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोरम, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पंजाब या राज्यांचा समावेश आहे.
नेमकं पथकाकडून काय केले जाणार
ज्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक असेल अशा राज्यात केंद्र एक विशिष्ट पथक पाठवणार आहे. या पथकांकडून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि त्यावर लक्ष ठेवणे, यासह प्रतिबंधात्मक कारवायांवर लक्ष ठेवणार आहेत. कोरोना चाचणी, कोरोनासंबंधित नियमांचं पालन, त्यांची अंमलबजावणी, रुग्णालयात उपलब्ध बेड्स यांची पाहणी या पथकाकडून घेण्यात येणार आहे. तसेच कोरोना लसीकरणाचा वेग किती आहे, लसीकरण कसे सुरू आहे, याकडे हे पथक लक्ष देणार आहे.
(हेही वाचा- ईडीचा दणका! नीरव मोदीच्या संपत्तीचा होणार लिलाव)
भारतातील १७ राज्यांमध्ये ४१५ बाधिते आढळले आहेत तर ११५ रूग्णांना पूर्णपणे कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक १०८ ओमायक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली आहे. भारतात ओमायक्रॉनमुळे आतापर्यंत एकही जणाचा मृत्यू झाला नाही.
Join Our WhatsApp Community