GST भिवंडी आयुक्तालयाकडून 132 कोटींच्या रॅकेटचं पर्दाफाश, मास्टरमाइंडला अटक

सीजीएसटीच्या मुंबईस्थित भिवंडी आयुक्तांच्या पथकाने बनावट इनव्हॉइस रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मुंबईमधील CGST भिवंडी आयुक्तालयाने 132 कोटी रुपयांचे रॅकेट उघडकीस आणले आहे. यासह बनावट इनव्हॉइस, बिल जारी करणे, तसेच 23 कोटी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेणे किंवा ते पास करणे अशा बनावट इनव्हॉइस बिल रॅकेटचा पर्दाफाश केला.

(हेही वाचा – प्रभादेवीतील शिवसेना विरूद्ध शिंदे गटातील राडा प्रकरणी २५ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल)

यापूर्वी ऑगस्टमध्येही, सीजीएसटी भिवंडी आयुक्तालयाने इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवण्यासाठी बनावट इनव्हॉइसच्या आधारे दावे करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. याप्रकरणी एकाला अटकही करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, 132 कोटी रुपयांच्या बनावट इनव्हॉइसच्या आधारे 23 कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवण्याच्या संदर्भात छापे टाकण्यात आले. या रॅकेटचा मास्टरमाईंड हसमुख पटेल याला अटक करण्यात आली असून, त्याला 23 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सीजीएसटी भिवंडीचे आयुक्त सुमित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी बनावट जीएसटी चालानद्वारे इनपुट टॅक्स क्रेडिटचा फायदा घेत होती. या टोळीशी संबंधित एका फर्मने 14.30 कोटी रुपयांच्या बनावट इनव्हॉइसद्वारे 2.57 कोटी रुपयांचा आयटीसीचा लाभ घेतला होता. ही बाब समोर येताच कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here