बनावट बिलांच्या आधारे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवण्याचा दावा करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा मुंबईतील CGST भिवंडी आयुक्तालयाच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. 41 कोटींच्या बनावट बिलांच्या आधारे सुरुवातीला 18 कोटींची आयटीसी सापडली आहे. याप्रकरणी एका फर्मच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
(हेही वाचा – मलिकांविरोधात गुन्हा दाखल करताच वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी; तक्रार दाखल)
सीजीएसटी भिवंडीचे आयुक्त सुमित कुमार म्हणाले की, ही टोळी बनावट जीएसटी चालानद्वारे इनपुट टॅक्स क्रेडिटचा फायदा घेण्यात व्यस्त होती. या टोळीशी संबंधित एका फर्मने 14.30 कोटी रुपयांच्या बोगस बिलांद्वारे 2.57 कोटी रुपयांचा आयटीसी घेतला होता. ही बाब समोर येताच कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली.
CGST Bhiwandi Commissionerate in Mumbai Zone busted a fake GST invoice racket that was used to avail & pass on fake Input Tax Credit of around Rs 18 cr on bogus invoices of Rs 41cr. One person has been arrested in this matter under CGST Act: Sumit Kumar Commissioner,CGST Bhiwandi
— ANI (@ANI) August 19, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, मेसर्स विश्वकर्मा एंटरप्रायझेस असे अटक केलेल्या व्यक्तीच्या फर्मचे नाव आहे. त्याने 14.30 कोटी रुपयांच्या बनावट इनव्हॉइसवर 2.57 कोटी रुपयांचे आयटीसी मिळवले. CGST कायदा, 2017 च्या कलम 132 चे उल्लंघन केल्याबद्दल CGST कायदा, 2017 च्या कलम 69 अंतर्गत आरोपीला अटक करण्यात आली आहे. भिवंडी सीजीएसटी आयुक्तांनी त्यांची जामिनावर सुटका केली. हे प्रकरण कर घोटाळेबाज आणि बनावट ITC नेटवर्क विरुद्ध CGST मुंबई झोनने सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग आहे. गेल्या वर्षभरात सीजीएसटी भिवंडीकडून अटक करण्यात आलेली ही 15वी घटना असून पुढील तपास सुरू आहे.
Join Our WhatsApp Community