गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील चांदणी चौकातला पूल पाडण्याची चर्चा सुरू होती. अखेर हा पूल जमीनदोस्त करण्यात आला आहे. यानंतर या परिसरात आज सोमवारी पुन्हा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती पुणे वाहतूक पोलीस आणि पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस उपायुक्त यांनी दिली आहे. या पुलाच्या बाजूचे खडक फोडण्याचे काम बाकी असल्याने आज दिवसभरातून २ वेळा या मार्गावरील वाहतूक २० मिनिटं बंद केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
(हेही वाचा – मंगळयान मिशन संपुष्टात, 8 वर्षानंतर मंगळयानाचे इंधन संपले, बॅटरीही डाऊन)
मिळालेल्या माहितीनुसार, खडक फोडण्याचे काम ब्लास्ट पद्धतीने होत असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहतूक २० मिनिटं बंद केली जाणार आहे. दुपारी १ ते २ दरम्यान २०० मीटर लांब गाड्या २० मिनिटासाठी थांबवल्या जातील. रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेले सर्व्हिस रोड लवकरच सुरू व्हावेत यासाठी हे खडक फोडण्याची गरज आहे. त्यामुळे हे काम लवकर करण्यात येत आहे. तर दुपारच्या दरम्यान काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
तर वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी चांदणी चौकातील पूल पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री हा पूल पाडण्यात आला. आता रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला खडक असल्याने ब्लास्ट करून या खडकाला फोडण्याचे काम करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community