पंजाबमधील चंदीगड विद्यापीठात एक निंदयनीय प्रकार घडला आहे. एका विद्यार्थिनीनेच वसतिगृहातील विद्यार्थिनींचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर येथील विद्यार्थिनींमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांनी विद्यापीठातच आंदोलन छेडले आहे. त्यानंतर आता त्यांच्यातील काही विद्यार्थिनींनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वसतिगृह सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
महाविद्यालयाला सुट्टी जाहीर
आपण इथे सुरक्षित नसल्याचे सांगत काही विद्यार्थिनींनी सोमवारी सकाळी वसतिगृहातून बाहेर पडत घरची वाट धरली आहे. दरम्यान या प्रकरणाची दखल घेगत विद्यापीठाने 24 सप्टेंबरपर्यंत महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विद्यार्थिनीला ताब्यात घेतले असून व्हिडिओ व्हायरल करण्याप्रकरणी विद्यार्थिनीच्या बॉयफ्रेंडला देखील अटक करण्यात आली आहे. दरम्यान विद्यापीठ प्रशासनाकडून याबाबत कोणतीही ठोस भूमिका न घेण्यात आल्याने विद्यार्थिनींनी वसतिगृह सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
विद्यार्थिनींचा निर्णय
आम्ही वसतिगृहात सुरक्षित नसल्यामुळे आम्ही घरी जाण्याचा निर्णय घेत आहोत. पीडित विद्यार्थिनींना न्याय मिळेल असं आम्हाला वाटत नाही. कारण प्रशासनाकडून याबाबत कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान विद्यापीठातील इतर विद्यार्थिनींनी आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे. या प्रकरणात एकूण 60 विद्यार्थिनींचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यापैकी 8 विद्यार्थिनींनी याबाबतची माहिती मिळताच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
Join Our WhatsApp Community