चंद्रपूरने मोडला तापमानाचा 100 वर्षांचा रेकॉर्ड!

गेल्या दोन तीन दिवसांपासून विदर्भात उष्णतेच्या झळांच्या वाढत्या तीव्रतेने चंद्रपूरातील शंभर वर्षाच्या एप्रिल महिन्याचा रेकॉर्ड मोडला. चंद्रपूरात कमाल तापमान ४६.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. संपूर्ण विदर्भात सध्या कमाल तापमान ४२ ते ४६ अंशादरम्यान पोहोचले आहे. अजून दोन दिवस विदर्भवासीयांना या उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागेल.

मे महिन्यात महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ

विदर्भात एप्रिल महिन्याच्या सरासरीपेक्षाही दोन ते चार अंशाने जास्त कमाल तापमान नोंदवले जात आहे. या मे महिन्यात महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ होणार असली तरीही उष्णतेच्या लाटांची फारशी स्थिती नसल्याचा अंदाज भारतीय वेधशाळेने व्यक्त केला आहे. मात्र विदर्भातील वाढती उष्णता लक्षात घेता या भागांतील वाढत्या तापमानाकडे आम्ही लक्ष ठेवून असल्याची माहिती भारतीय वेधशाळेचे उपमहासंचालक डॉ. मृत्यूंजय मोहापात्रा यांनी दिली.

(हेही वाचा – राणा दाम्पत्याला दुसऱ्या दिवशीही दिलासा नाही, आता फैसला सोमवारी)

उष्ण शहरांच्या यादीत चंद्रपूर सहाव्या स्थानी

या आधी एवढ्या मोठ्या संख्येने विदर्भात उष्णतेची लाट आली नव्हती. ही वाढती संख्या लक्षात घेत विदर्भात उष्णता नियंत्रणात राखण्यासाठी उपाययोजना करायला हव्यात, अशी मागणी आता होत आहे. जगभरातील उष्ण शहरांच्या यादीत चंद्रपूर सहाव्या तर ब्रह्रमपुरी नवव्या स्थानावर होते.

(हेही वाचा – मे महिना दिलासादायक नाहीच, तापमानाचा पारा कायम)

विदर्भातील कमाल तापमानाची नोंद (अंश सेल्सिअसमध्ये)

  • चंद्रपूर – ४६.६
  • ब्रह्मपुरी – ४६.३
  • अकोला – ४५.५
  • वर्धा – ४५
  • यवतमाळ – ४४
  • नागपूर – ४४.६
  • गोंदिया – ४४.५
  • अमरावती – ४४.२
  • गडचिरोली – ४२.८
  • बुलडाणा – ४२

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here