राज्यात विदर्भात उष्णतेच्या लाटेच्या प्रभावात गुरुवारी चंद्रपूर हे जगभरातील सर्वात उष्ण शहर ठरले. चंद्रपूरात कमाल तापमान ४५.४ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. देशातील बारा शहरांचा जगभरातील उष्ण शहरांच्या यादीत पहिल्या पंधरा शहरांमध्ये समावेश झाला. मात्र या यादीत अप्रत्यक्षरित्या राज्यातील स्वयंचलित केंद्रातून मोजली गेलेली भिरा आणि कर्जत ही राज्यातील दोन शहरेही अकराव्या स्थानावर पोहोचली. या दोन्ही शहरांत कमाल तापमान ४३.५ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले.
विदर्भाखालोखल कोकणातील अंतर्गत आणि दक्षिणेकडील भागांतही पारा जास्त वाढल्याचे दिसून आले. विदर्भातील ब्रह्रमपुरी जगभरातील उष्ण शहरांच्या नोंदीत सातव्या स्थानावर ४४ अंश सेल्सिअसच्या नोंदीसह सातव्या स्थानावर पोहोचले. वर्ध्याला दहावे स्थान मिळाले. वर्धा येथील कमाल तापमानाची नोंद ४३.८ अंश सेल्सिअसपर्यंत झाली. चंद्रपूर, ब्रह्मपुरी आणि वर्धा ही तीन शहरे जागतिक नोंदीत पोहोचलेली असताना वर्षभरापूर्वी सुरु झालेले कर्जत येथील स्वयंचलित केंद्रातील कमाल तापमान आणि समुद्रसपाटीपासून कित्येक किलोमीटर लांब असलेले भिरा येथील कमाल तापमान पुन्हा थेट ४३.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. ही दोन्ही स्वयंचलिक केंद्रे भारतीय हवामान खात्यावतीने कार्यान्वित केली जातात.
( हेही वाचा : वाहतूक नियम मोडाल तर याद राखा, मिळणार ही अजब शिक्षा )
जगभरातील उष्ण शहरांची यादी
१) भारतातील महाराष्ट्र राज्यातील विदर्भात ४५.४ अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान चंद्रपूरात नोंदवले गेले. हे तापमान भारतातील गुरुवारचे सर्वात जास्त कमाल तापमान ठरले.
२) भारतातील उत्तर प्रदेशातील बांदा शहराला जगभरातील उष्ण शहरांच्या यादीत दुसरा क्रमांक मिळाला. बांदा येथील कमाल तापमानाची नोंद ४५ अंशापर्यंत पोहोचली.
३) भारतातील मध्य प्रदेशातील नवगोंग शहरातील कमाल तापमानाची नोंद ४४.५ अंश सेल्सिअएवढी झाली. नवगोंग शहर जगभरातून तिस-या स्थानावर आले
४) सेनेगल देशातील मतम शहराला चौथे स्थान मिळाले. मतम शहरात ४४.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
५) भारतातील उत्तर प्रदेशातील झांसी येथे ४४.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. झांसी येथे ४४.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
६) भारतातील उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील बदतपूर विमानतळ परिसरात कमाल तापमानाची नोंद ४४.२ एवढी झाली. वाराणसी येथील बदतपूर येथील कमाल तापमानाला सहावे स्थान मिळाले.
७) सातव्या स्थानावर ४४ अंश सेल्सिअससह विदर्भातील ब्रह्रपुरीतील कमाल तापमान पोहोचले.
८) सेनेगल देशातील लिंगार शहरातही ४४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. लिंगार शहराला आठवे स्थान मिळाले.
९) देशातील मध्यप्रदेश राज्यातील दमोह शहरातील ४३.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद नवव्या स्थानावर झाली.
१०) राज्यातील विदर्भातील वर्ध्यातही ४३.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. वर्धा शहर दहाव्या स्थानावर पोहोचले.
११) देशातील तेलंगणा राज्यातील अदिलबाद येथे ४३.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. या शहराला अकरावे स्थान मिळाले.
१२) माली देशातील केयस शहरात ४३.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
१३) देशातील उत्तर प्रदेशातील वाराणसी शहाराला ४३.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानासह तेरावे स्थान मिळाले.
१४) देशातील मध्य प्रदेश राज्यातील दतिआ शहराला ४३.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानासह जागतिक क्रमवारीत चौदावे स्थान मिळाले.
१५) देशातील तेलंगणा राज्यातील निझामाबाद येथील कमाल तापमानाची नोंद ४३.४ अंश सेल्सिअस एवढी झाली. निझआमाबाद शहराला पंधरावे स्थान मिळाले.