चंद्रपूरात वर्षाअखेरीस वाघाच्या हल्ल्यात ५३ वा बळी; वाढत्या संख्येने लोकांमध्ये वाढतोय संताप

107

चंद्रपूरात शनिवारी वाघाच्या हल्ल्यात वर्षाच्या अखेरीस मानवाचा ५३ वा बळी गेला. शेतात काम करणा-या महिलेला वाघाने ठार केले. ब्रह्मपरी येथील तोरगाव येथे ही घटना घडली. या हल्ल्यामागे पी-२ ही अडीच वर्षांची वाघीण असल्याची शंका वनाधिका-यांनी व्यक्त केली.

सीताबाई सलामे (६०) असे या मृत महिलेचे नाव आहे. शेतात काम करत असताना सीताबाई यांच्या ओरडण्याचा आवाज जवळपास काम करणा-या लोकांनी ऐकला. तोपर्यंत वाघीणीने घटनास्थळापासून पळ काढला. सीताबाई यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तोरेगाव गावात वाघाच्या वाढत्या हल्ल्यात माणसांच्या बळींची संख्या वाढत आहे. अगोदरच चितपल्ली आणि सावनी येथेही वाढत्या वाघांच्या हल्ल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पी-२ ही पी-१ या वाघाची साथीदार आहे. पी-२ला डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात जेरबंद करण्यात आले होते. पी-२ ने नजीकच्या काळात दोन माणसांवर हल्ला केला आहे. पी-२ च्या शनिवारच्या हल्ल्यात सीताबाई यांचा मृत्यू झाल्यानंतर लोकांनी बराच काळ मृतदेह वनविभागाच्या ताब्यात द्यायला नकार दिला. अखेरीस पोलिसांच्या मदतीने तणाव निवळल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

( हेही वाचा: Nashik Fire: 100 हून अधिक जण अडकल्याची भीती; मुख्यमंत्री घटनास्थळाकडे रवाना )

चंद्रपूरातील ट्रान्झिट सेंटरमध्ये ऑक्टोबर महिन्यापासून तीन वाघ पिंज-यात ठेवले आहेत. ट्रान्झिट सेंटरमध्ये केवळ दोन वाघांसाठी जागा असताना चितपल्ली, ब्रह्मपुरी तसेच सावनी येथील जेरबंद करण्यासाठी वनाधिकारी शोधत असलेले वाघ पकडल्यानंतर कुठे ठेवायचे हा मोठा प्रश्न वनविभागासमोर आहे. तीनपैकी दोन वाघांना बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणायचा निर्णय झाला असला तरीही वनविभागाकडून अद्यापही लेखी आदेश आलेला नाही. हल्लेखोर वाघ पकडून ठेवायचे कुठे असा मोठा प्रश्न चंद्रपूर वनविभागासमोर आहे. मात्र याबाबतीत वरिष्ठ पातळीवरुनच निर्णय घेतला नाही, अशी माहिती वनाधिका-यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.