चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही भागात वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. चिकमारा भागात वाघाच्या हल्ल्यात संतोष नैतम (63) या गुरख्याचा सकाळी मृतदेह आढळला.
रविवारी सायंकाळी उशिराने संतोष नैताम जंगलभागात गाईंना चारण्यासाठी घेऊन गेले होते. मात्र रात्री उशिरा घरी परत न आल्याने स्थानिकांनी संतोष यांना शोधायला सुरुवात केली. अखेर सकाळी चिकमारा परिसरात त्यांचा मृतदेह आढळला. गेल्या आठवड्यातही चंद्रपूर जिल्ह्यात दोन माणसांचा वाघ्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. वाढत्या वाघाच्या हल्ल्यामुळे सायंकाळी आणि सकाळी वाघाचा वावर असलेल्या क्षेत्रात जाऊ नका, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
( हेही वाचा: अमृत महोत्सवानिमित्त सोन्याचांदीची नाणी )
Join Our WhatsApp Community