मंगलवेशातील हजारो रामभक्त… रामभक्तीने ओतप्रोत वातावरण… एका क्षणाला हजारो पणत्या प्रज्वलित व्हायला सुरुवात झाली… आणि बघता बघता ‘सियावर रामचंद्र की जय’ ही दीपाक्षरे अवतरी. हे विहंगम दृष्य साकारले होते चंद्रपूरच्या (Chandrapur) चांदा क्लब ग्राऊंडवर. ३३ हजार २५८ पणत्यांनी साकारलेला रामनामाचा मंत्र गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घालणारा ठरला आणि अवघे चंद्रपूर ‘राममय’ झाले. याची दखल घेत आज (रविवार) गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे मिलींद वेरलेकर आणि प्रसाद कुलकर्णी यांनी सुधीर मुनगंटीवार यांना प्रमाणपत्र प्रदान केले तेव्हा टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर शहरातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा महानगराचे अध्यक्ष राहुल पावडे, देवराव भोंगळे, डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी वाचनालय अध्यक्ष राजेश्वर सुरावार आदींची उपस्थिती होती.
दीपोत्सवाचे जगभरातील लाखो रामभक्त साक्षीदार ठरले. पहिली रामज्योत प्रज्वलित करण्याचा मान वाल्मिकी समाजाच्या शशी लखन, दुसरी ज्योत प्रज्वलित करण्याचा मान केवट भोई समाजाच्या आशा दाते, तिसरी ज्योत प्रज्वलित करण्याचा मान मुस्लिम समाजाच्या चांद पाशा सय्यद, चौथी ज्योत प्रज्वलित करण्याचा मान अनुसूचित जातीच्या प्रियंका थुल, पाचवी ज्योत प्रज्वलित करण्याचा मान आदिवासी समाजाच्या गीता गेडाम तर सहावी रामज्योत प्रज्वलित करण्याचा मान शीख समाजाच्या वतीने बलजीत कौर बसरा यांना मिळाला. तसेच सपना मुनगंटीवार, शलाका बिडवई यांनीही ज्योत पेटवली. त्यानंतर राम सेविकांमार्फत संपूर्ण ज्योती पेटविण्यात आल्या.
(हेही वाचा – Tata Mumbai Marathon : टाटा मॅरेथॉनमध्ये सावरकर स्मारकातील योगा केंद्रातील ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग)
नयनरम्य सोहळ्यानिमित्त चंद्रपूरकरांचे कौतुक
हा नयनरम्य सोहळा साजरा होत असताना सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरकरांचे कौतुक केले. ‘अयोध्येच्या प्रभू श्रीराम मंदिरासाठी 29 मार्च 2023 रोजी चंद्रपूर-गडचिरोलीच्या दंडकारण्यातून अतिशय पवित्र भावनेने सागवान काष्ठ पाठविण्यात आले. त्या काष्ठापासून प्रभू राम मंदिराच्या गर्भगृहाच्या महाद्वाराचे अतिशय सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे. प्रभू श्रीरामाच्या नावामध्ये चंद्रपूरचा चंद्र देखील आहे. प्रभू राम देशाच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे विश्वविक्रमी रामज्योत प्रज्वलित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही रामज्योत सेवेची व भक्तीची आहे,’ अशा उत्स्फूर्त भावना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.
गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
‘सियावर रामचंद्र की जय’ या ११ अक्षरी मंत्राच्या दीपप्रज्वलनाचे फोटो व व्हिडिओ गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या लंडन कार्यालयाला तसेच १८० देशांमध्ये पाठविले जाणार आहेत, अशी माहिती गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे मिलिंद वेरलेकर यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community