Chandrayaan 1 ने चंद्रावर पाणी शोधले होते. पृथ्वीमुळे चंद्रावर पाणी बनले होते. कारण या ठिकाणाहून जाणारी हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी बनण्यास मदत करत आहेत, असा वैज्ञानिकांनी दावा केला आहे. अमेरिकेतील मनोवामध्ये स्थित हवाई युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी हा खुलासा केला आहे. या अभ्यासात समोर आले की, पृथ्वीच्या चौफेर असलेल्या प्लाझ्माच्या शीटमुळे चंद्राचे दगड वितळतात किंवा तुटतात त्यातून खनिज निर्माण होते अथवा ते बाहेर येते. याशिवाय चंद्राचा पृष्ठभाग आणि वातावरणातील हवामानही सतत बदलत असते. ही स्टडी नेचर एस्ट्रोनॉमी जर्नलमध्ये प्रकाशित झाली आहे. ज्यात म्हटले की, इलेक्टॉन्समुळे चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी बनत आहे.
चंद्रावर पाणी कुठे आहे आणि किती प्रमाणात आहे याची पृथ्वीवर असणाऱ्या वैज्ञानिकांना कल्पना नाही. हे शोधणेही अवघड आहे. त्यामुळे चंद्रावरील पाण्याचा स्त्रोतचे कारण समजत नाही असे सांगितले आहे. जर चंद्रावर पाणी कसे आणि कुठे मिळेल, अथवा किती लवकर पाणी बनवले जाईल हे समजले तर भविष्यात त्याठिकाणी मानवी वस्ती बनवण्यास मदत मिळेल. Chandrayaan 1च्या एका यंत्राने चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचे कण पाहिले होते. हे भारताचे पहिले चंद्र मिशन होते. चंद्र आणि पृथ्वी दोघेही सौर वाऱ्याच्या परिघात आहेत. सौर वाऱ्यामध्ये हाय एनर्जीचे कण जसे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन इ. ते चंद्राच्या पृष्ठभागावर वेगाने हल्ला करत राहतात. त्यांच्यामुळेच चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी तयार होत असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे.
(हेही वाचा Aditya L1 : आदित्य एल-1 ची पृथ्वीभोवती चौथी प्रदक्षिणा पूर्ण; सूर्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे)
चंद्रावरील बदलत्या हवामानामागील कारण म्हणजे जेव्हा सौर वारा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातून जातो तेव्हा तो चंद्राचे संरक्षण करतो. परंतु सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या प्रकाश फोटॉनपासून चंद्राचे संरक्षण करणे पृथ्वीला शक्य नाही. असिस्टेंट रिसर्चर शुआई ली यांनी सांगितले की, आम्हाला चंद्रावर एक नैसर्गिक प्रयोगशाळा सापडली आहे. आम्ही या प्रयोगशाळेतूनच त्याचा अभ्यास करतो. येथून आम्ही चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी तयार होण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास करत आहोत. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या किंवा मॅग्नेटोटेलच्या बाहेर असतो तेव्हा सूर्याच्या उष्ण वाऱ्यांचा त्याच्यावर जास्त हल्ला होतो.
Join Our WhatsApp Community