काल म्हणजेच बुधवार २३ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशासाठी महत्वाचा ठरला. संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी (Chandrayaan 3 And AI Technology) चंद्रयान ३ चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाले. एआय म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने चंद्रयान-3 यशस्वीपणे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करू शकले. त्यामुळे एआय या तंत्रज्ञानाचा या मोहिमेत मोठा वाटा असल्याचे म्हंटले जात आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांकडूनच इस्रोचे कौतुक होत आहे.
बंगळुरूमधील मिशन कंट्रोलने लँडिंगची सूचना दिल्यानंतर, बुधवारी (२३ ऑगस्ट) सायंकाळी ६.०४ वाजता (Chandrayaan 3 And AI Technology) चंद्रयानाचं लँडर मॉड्यूल हे चंद्रावर उतरलं. यासाठी ऑटोमॅटिक लँडिंग सीक्वेन्सचा वापर करण्यात आला. विक्रम लँडरने स्वतःच सर्व प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. AI प्रणाली म्हणजे लँडरवर (Chandrayaan 3) नेव्हिगेशन, मार्गदर्शन आणि नियंत्रण प्रणाली. “हे चंद्रयान 3 (Chandrayaan 3 And AI Technology) मध्ये राहणारे संगणक तर्कशास्त्र आहे. हेच त्याला लँडिंगसाठी योग्य स्थितीत नेत होते. जेव्हा जेव्हा लँडरला कसे जायचे याचा निर्णय घ्यावा लागतो तेव्हा मार्गदर्शन आणि नियंत्रण यंत्रणा लँडरला लँडिंगच्या मार्गावर घेऊन जात होते.
Chandrayaan-3 Mission:
‘India🇮🇳,
I reached my destination
and you too!’
: Chandrayaan-3Chandrayaan-3 has successfully
soft-landed on the moon 🌖!.Congratulations, India🇮🇳!#Chandrayaan_3#Ch3
— ISRO (@isro) August 23, 2023
(हेही वाचा – Chandrayaan 3 : चंद्रावर उतरताच विक्रम लँडरने पाठवले चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो)
एआय तंत्रज्ञानामुळे ऐतिहासिक क्षणाचे होता आले साक्षीदार
‘चंद्रयान-3’च्या (Chandrayaan 3 And AI Technology) लँडिंगसाठी जागा निवडणे, योग्य जागेचा शोध घेणे, अनुकूल स्थिती नसल्यास पुढे जाऊन नवीन जागा शोधणे, आणि कमांड मिळाल्यानंतर लँडिंगची प्रक्रिया सुरू करणे या सर्व गोष्टी लँडर मॉड्यूलने स्वतःच केल्या. यासाठी एआयची मदत घेण्यात आली. विक्रम लँडरची स्थिती, गती आणि अल्टिट्यूड या सर्व गोष्टींना एआय सेन्सर्सच्या माध्यमातून सांभाळण्यात आलं. सोबतच, लँडरची चंद्राच्या पृष्ठभागापासून असणारी उंची मोजण्यासाठी देखील वेगळ्या एआय सेन्सर्सचा वापर करण्यात आला. तर लँडर मॉड्यूलवर असणारे कॅमेरे देखील एआय पॉवर्ड होते. या सर्व एआय सेन्सर्सने दिलेल्या डेटामुळे लँडरची लोकेशन ट्रॅक करणं सुलभ झालं. यामुळेच लँडिंग सुरू असताना लाईव्ह फोटोज इस्रोला मिळत होते. इस्रोसोबतच संपूर्ण जग या ऐतिहासिक क्षणाचे थेट प्रक्षेपण पाहू शकला. यामुळेच सामान्य व्यक्तीलाही विक्रम लँडरचा वेग, चंद्राच्या पृष्ठभागापासून त्याची उंची अशा गोष्टी पाहू शकत होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community