मिशन चांद्रयान-3 अंतर्गत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्रो) मोठे यश मिळाले आहे. इस्रोने सीई-20 क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी उड्डाण चाचणी केली आहे. याबाबत इस्त्रोकडून मिळालेल्या माहितीनुसार ही चाचणी पूर्वनिर्धारित 25 सेकंदांच्या कालावधीसाठी घेण्यात आली. इस्रोने एक निवेदन जारी करून सांगितले की, चाचणी दरम्यान सर्व पॅरामीटर्स समाधानकारक आढळले आहेत.
( हेही वाचा : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर अखेर तोडगा! मुख्यमंत्र्यांनी पगाराबाबत केली मोठी घोषणा )
या वर्षाच्या सुरुवातीला, चांद्रयान-3 च्या लँडरची यूआर राव सॅटेलाइट सेंटरमध्ये यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. चांद्रयान-3 ही भारताची तिसरी चंद्र मोहीम आहे. ही मोहीम जूनमध्ये सुरू करण्याचे नियोजन आहे. चांद्रयान-2 नंतर चांद्रयान-3 मोहिमेची तयारी इस्त्रोकडून करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान-3 प्रक्षेपित करण्यात येणार आहे.
मिशन चांद्रयान ३
चांद्रयान २ प्रमाणे यंदाचे उद्दिष्ट सुद्धा सारखेच आहे गेल्यावेळी ज्या चुका झाल्या त्या टाळून यानने सुरक्षित लॅडिंग आणि त्यानंतर रोटर सुरक्षित बाहेर निघावे याकडे विशेष भर देण्यात येणार आहे. चांद्रयान ३ मध्ये प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा काम करू शकले असे नियोजन करण्यात आले आहे तसेच यातील सॉफ्टवेअर, सेन्सर, तंत्रज्ञान हे अधिक अपग्रेडेड असेल असे, इस्त्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले. जून ते जुलै दरम्यान चांद्रयान ३ अंतराळात सोडण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
Join Our WhatsApp Community