Chandrayaan 3 : चांद्रयान ३ मोहीम होणार यशस्वी; कारण यानाची ‘ही’ आहेत वैशिष्ट्ये?

254

अंतराळातील मोहिमेच्या वेळी यानाच्या परिस्थितीची माहिती पृथ्वीवर यायला आणि पृथ्वीवरून चंद्रावर परत संदेश पाठवायला जवळपास तीन सेकंद लागतात.  एवढ्या विलंबाने शेवटचे अत्यंत जलदगतीने घ्यावयाचे निर्णय घेणे शक्य नसते. त्यामुळे सर्व निर्णय तिथल्या संगणकालाच घ्यावे लागतात. अंतराळात रस्ता नाही की यानाला टायर नसतात, त्यामुळे गती वाढवण्याचे आणि कमी करण्याचे असे दोन्ही कार्ये इंजिनालाच करावी लागतात. तेथील जमिनीवर यान उतरावतांना यानाची दिशा उलटी करून इंजिन सुरु ठेवले की ब्रेक लागतो आणि गती कमी होते. चांद्रयान २ मध्ये यान फिरवतांना कदाचित किंचितशी चूक झाली आणि यान कोसळले. मात्र चांद्रयान ३ साठी अनेक दक्षता आणि खबरदारी घेण्यात आली आहे. यावेळीचे लॅन्डर रॉकेट मोठे आहे. यान उतरवण्याच्या संभाव्य जागेसाठी खूप मोठा प्रदेश निश्चित केला आहे. यानाच्या अवस्थेची माहिती पुरवणारे सेन्सर देखील वाढवण्यात आलेले आहेत, जेणेकरून एखादा सेन्सर बंद जरी पडला तरी इतर सेन्सर्सकडून माहिती घेऊन कार्य सिद्धीस नेण्यात येईल.

काय आहेत चांद्रयान ३ ची वैशिट्ये? 

  • यानाला घेऊन जाणाऱ्या रॉकेट आणि यानाचे वजन साधारण ६४० टन आहे. भरलेल्या विटांचा ट्र्क जवळपास १५ टन असतो. असे ४२ ट्र्क इतके रॉकेटचेच वजन आहे.
  • रॉकेटची उंची ४३.५ मीटर आहे. (साधारणपणे १५ मजली इमारती इतकी आहे.)
  • बाजूने जोडलेले दोन एस २०० बूस्टर रॉकेटपैकी प्रत्येकाचे सुरुवातीचे वजन २०० टन आहे. हे रॉकेट एका सेकंदात २ टन इंधन जाळते. साधारण पेट्रोलचा फुल-साईज टँकर १२ टनांचा असतो, म्हणजे ६ सेकंदात एक सगळा टँकर भरून इंधन जळत होते. आपल्याला एक टॅंकर पेट्रोल रिकामे करायला किती वेळ लागतो याचा अंदाज घेतला की, हे किती अजस्त्र अवाढव्य रॉकेट आहे.
  • साधारण ८ मिनिटांनी यानाने सेकंदाला ५ किमी एवढी गती गाठली होती, ते जवळपास उड्डाणाच्या ठिकाणावरून १३०० किमी लांब पोहोचले होते. (एका तासात ३,६०० सेकंद असतात. म्हणजे स्पीड ताशी अठरा हजार किमी!! आपली मोठी प्रवासी विमाने कमाल ९०० किमी/तास एवढ्या वेगाने उडतात – म्हणजे त्याच्या वीस पट.)
  • साधारण ११.२ किमी प्रति सेकंद एवढी गती गाठावी लागते. पृथ्वीपासून लांब जायला (विमानाच्या ४० पट). ती गाठेपर्यंत पृथ्वीच्या भोवती चकरा मारणे आवश्यक असते.
  • चंद्राकडे झेपावणाऱ्या यानाचे वजन साधारण ४ टन आहे. जवळपास एका मोठ्या हत्ती एवढे. त्याला चंद्राजवळ पोहोचण्यासाठी साधारण ४५ दिवस लागतील व २३ ऑगस्टच्या आसपास ते उतरवले जाण्याची शक्यता आहे.
  • त्यावरचे आवरण आणि वरचे फिरणारे यान सोडले तर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारे यान (लॅन्डर) १,७०० किलोचे आहे.
    ते सुखरूप उतरल्यावर त्यातून बाहेर येणारी रोव्हर गाडी फक्त २६ किलोची आहे…जी चंद्रावर पोहोचवण्यासाठी हा सगळं खटाटोप!!!
  • ह्या वेळेस आपल्या वैज्ञानिकांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवण्याचा निर्णय घेतला आहे, कारण तिथे असणारी खनिजे व पाण्याचा अंश वेगळा असण्याची शक्यता आहे.
  • साधारण १५ दिवस ती रोव्हर गाडी इकडे-तिकडे फिरेल व संशोधन कार्य करून रिपोर्ट पाठवेल. नंतर सुद्धा सुरु राहिली तर बोनस..!

(हेही वाचा चांद्रयान-३ चे यशस्वी उड्डाण; ‘इतक्या’ दिवसांनी लँडर उतरणार चंद्रावर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.