Chandrayaan 3 : चंद्रावर उतरताच विक्रम लँडरने पाठवले चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला आहे

219
Chandrayaan 3 : चंद्रावर उतरताच विक्रम लँडरने पाठवले चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या चंद्रयान ३ (Chandrayaan 3) या मोहिमेकडे होतं. चंद्रयान २ मोहीम अपयशी ठरल्यानंतर चंद्रयान ३ मोहिमेत यश मिळवण्यासाठी इस्रोच्या वैज्ञानिकांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि भारतीयांना तो ऐतिहासिक क्षण पाहता आला. भारताची चंद्रयान ३ ही महत्त्वकांक्षी मोहीम यशस्वी झाली असून इस्रोने पाठवलेलं यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरलं आहे. विक्रम लँडरने संध्याकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी चंद्रयानाचं चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं.

चंद्रयान ३ च्या विक्रम लँडरने (Chandrayaan 3) चंद्रावर पहिलं पाऊल टाकल्यानंतर आता चंद्राच्या पृष्ठभागाचे चार फोटो पाठवले आहेत. इस्त्रोने हे फोटो त्यांच्या ट्विटरवरून शेअर केले आहेत. त्या आधी आपण आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचलो असल्याचा संदेश केला होता.

बुधवार २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनीटांनी इस्त्रोचे (Chandrayaan 3) चंद्रयान लँडरने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली आणि देशभरात एकच जल्लोष सुरू झाला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला आहे. तर यशस्वी चंद्रमोहीम पार पाडणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, चीन आणि रशियानंतर आता भारताचं नाव जोडलं गेलं आहे.

(हेही वाचा – Chandrayaan – 3 : पंतप्रधानांनी चंदामामा म्हटल्याबरोबर नेटकऱ्यांनी पृथ्वी आणि चंद्राचे केले रक्षाबंधन)

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे शास्त्रज्ञ गेल्या चार वर्षांपासून चंद्रयान ३ (Chandrayaan 3) उपग्रहावर काम करत होते. ज्या वेळी कोविड-19 महामारी देशात पसरत होती, त्या वेळी ISRO टीम भारताच्या मिशन मूनच्या तयारीत व्यस्त होती. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितले की, तब्बल १ हजार अभियंते आणि शास्त्रज्ञांनी सुमारे ७०० कोटी रुपये खर्च करून मिशन सुरू करण्यासाठी काम केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.