Chandrayaan 3 चा परतीचा प्रवास सुरु

प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत हलवले

243
Chandrayaan 3 चा परतीचा प्रवास सुरु

चंद्रयान-3 चे (Chandrayaan 3) प्रोपल्शन मॉड्यूल (पीएम) चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत हलवण्यात आले आहे, असे इस्रोने म्हटले आहे. चंद्रयान -3 मोहिमेचा प्राथमिक उद्देश चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशाजवळ सॉफ्ट लँडिंगचे प्रदर्शन करणे आणि ‘विक्रम’ लँडर आणि ‘प्रज्ञान’ रोव्हरवरील उपकरणांचा वापर करून प्रयोग करणे हा होता.

चंद्र मोहिमेच्या (Chandrayaan 3) दृष्टिकोनातून भारतीय अंतराळ संस्थेला (ISRO ) मोठे यश मिळाले आहे. इस्त्रोने पृथ्वीच्या कक्षेत चंद्राभोवती फिरणारे चांद्रयान-3 संदर्भात केलेला प्रयोग यशस्वी ठरला आहे. चंद्रयान -3 प्रोपल्शन मॉड्यूल पृथ्वीच्या कक्षेत परत आणले आहे. यामुळे इस्त्रोने अंतराळ संशोधनात नवीन इतिहास रचला आहे.

(हेही वाचा – CM Eknath Shinde : नौदलाच्या ध्वजामध्ये राजमुद्रेचा वापर महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद)

प्रोपल्शन मॉड्यूल (Chandrayaan 3) तीन महिने चंद्रावर राहिला. त्यानंतर 10 नोव्हेंबर रोजी चंद्रावरून पृथ्वीवर त्याचा परतीचा प्रवास सुरू झाला. २२ नोव्हेंबर रोजी हे यान पृथ्वीच्या सर्वात जवळच्या बिंदूतून गेले. यामुळे आता इस्त्रो फक्त चंद्रावर एखादी वस्तू पाठवणार नाही तर त्या ठिकाणावरुन परतही आणणार आहे.

हे प्रोपल्शन मॉड्यूल केवळ तीन महिने चंद्राच्या कक्षेत राहणार होते. मात्र, इस्रोच्या (Chandrayaan 3) बी शास्त्रज्ञांच्या कार्यक्षमतेमुळे त्यात १०० किलो इंधन शिल्लक राहिले. इस्रोने प्रोपल्शन मॉड्यूल पृथ्वीच्या कक्षेत परत आणण्यासाठी ते इंधन वापरण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे परतीच्या मोहिमेतही महत्त्वपूर्ण माहिती संकलित करता येईल असे इस्रोने म्हंटले आहे.

(हेही वाचा – Stock Market: शेअर बाजारात दमदार तेजी, ‘या’ समुहाच्या शेअर्सची नवीन उच्चांकावर उडी)

तसेच प्रोपल्शन मॉड्यूल १३ दिवसांत पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करत आहे. या मॉड्यूलची कक्षा देखील बदलली गेली आहे. तसेच पृथ्वीभोवती फिरणाऱ्या कोणत्याही उपग्रहाला प्रोपल्शन मॉड्यूल आदळण्याचा धोका नसल्याचे इस्त्रोने स्पष्ट केले आहे. (Chandrayaan 3)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.